शेतकऱ्यांवरील लाठीमारची भाजपला किमत मोजावी लागणार- खा. सुळे

प्रभात वृत्तसेवा
नगर – दिल्लीत झालेली शेतकऱ्यांवरील लाठीमारची घटना अतिशय दुदैवी आहे. त्याची भाजपला मोठी किमत मोजावी लागणार असल्याची टिका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केली.
खा. सुळे यांच्या उपस्थितीत येथील राष्ट्रवादी भवन येथे महिला मेळावा झाला. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, दिल्लीत शेतकरी शांतपणे आंदोलनासाठी जात असतांना त्यांना रस्त्यात अडवणून लाठीमार करण्यात आला. हे दुदैवी आहे. राफेल प्रकरणाची चौकशी जेपीसीमार्फत करण्यात यावी, मुख्यमंत्र्यांच्या भाषणे सांगायचे झाले तर सरकार पारदर्शक कारभार करीत आहे. मग राफेलची जीपीसीमार्फत चौकशी का करीत नाही. काय ते सत्य बाहेर येईल. असे सांगून खा. सुळे म्हणाल्या, आघाडी सरकारच्या काळात देखील शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाला. अर्थात त्या होणे चुकीचे आहे. पण या सरकारच्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. केवळ शेतकरीच नाही तर अन्य लोक देखील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आत्महत्या वाढल्या आहेत. एकेकडे शेतकरी आत्महत्या करतो तर दुसरीकडे रस्त्यावर झालेल्या खड्ड्यामुळे अपघात वाढले असून तेथेही बळी जाण्याची संख्या वाढत आहे. या सरकारने वर्षभरात रस्ते दुरुस्तीसाठी किती खर्च केला याची माहिती घेत आहे. पण रस्त्यावर वाढलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे.त्यातून खड्डे चुकवितांना अपघात होत आहे. मग आता 302 गुन्हा कोणावर दाखल करायला व्हा. मुख्यमंत्र्यांवर हे गुन्हे का दाखल होत नाही. असा सवाल त्यांनी केला.
सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे. सरकारच्या विरोधात कोणी काय बोलले तर त्याला गप्प करण्याचा प्रयत्न केला जातो. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. महिला असुरक्षित आहेत. अन्याय, अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे सरकारच्या विरोधात आता वातावरण होत आहे. असे त्या म्हणाल्या.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)