शेतकऱ्यांवरील गुन्हे माफ झाल्याने पवनानगर चौकात आनंदोत्सव

पवनानगर – नऊ ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधात पुणे-मुबंई एक्‍सप्रेस आंदोलन करण्यात आले होते त्यामध्ये तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. अनेक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. शेतकऱ्यांवरील गुन्हे न्यायलयाने मागे घेतल्याने शेतकऱ्यांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात फटाक्‍यांची अतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या वेळी तालुका अध्यक्ष प्रशांत ढोरे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, पवनाबंद जलवाहिनी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर दळवी, एकनाथ टिळे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर, गणेश धानिवले, नामदेव पोटफोडे, लक्ष्मण भालेराव यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, या संदर्भात 2 डिसेंबर रोजी वडगाव येथून विजयी मिरवणूक काढण्यात येईल. त्यावेळी पवनानगर येथे महासभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मावळ तालुक्‍याच्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊन नये मागच्या सात वर्षांत खूप त्रास झाला. शेतकऱ्यांवरील गुन्हे माफ झाल्याने आनंद वाटतो. पवना बंद जलवाहिनी कायमची रद्द झाली पाहिजे. मुख्यमंत्री, अर्थमंत्री, स्वर्गीय ऍड विनायकराव अभ्यंकर यांचे जाहीर आभार मानतो. ज्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्या शेतकऱ्यांवरील गुन्हे माफ झाल्याने आनंदोत्सव साजरा करतो. जे शेतकरी शहिद झाले आहे, त्यांना आदरांजली वाहतो.
– बाळा भेगडे, आमदार, मावळ.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)