शेतकऱ्यांमध्ये जिद्द ही जन्मत: भिनलेली असते

नगर – जीवनात खूप संकटे असतात, पण मनुष्यात जिद्द असल्यास प्रचंड संघर्षाने यशस्वी होता येते. शेतकऱ्यांमध्ये जिद्द ही जन्मत: अंगिभूत भिनलेली असते. अपयशाने खचून न जाता जिद्दीने उभे रहा, कोणतीही गोष्ट अशक्‍य नाही. मी शेतकरी असल्याचा अभिमान आहे, असे मत महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी दिग्दर्शक, निर्माते, लेखक भाऊराव कऱ्हाडे यांनी केले.

न्यू आर्टस वरिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी भाऊराव कऱ्हाडे बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार झावरे, सचिव जी.डी.खानदेशे, रा.ह.दरे, ऍड.दीपलक्ष्मी म्हसे, वसंत कापरे, जी.के.पाटील, अरुणा काळे, अलकाताई जंगले, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, यु.आर.ठुबे, प्राचार्य डॉ.बी.एच.झावरे, उपप्राचार्य ए.के.पंधरकर, आर.जी.कोल्हे, एम.व्ही.गिते आदि उपस्थित होते. यावेळी वर्षभर घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे विजेत्या व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
पुढे बोलतांना भाऊराव कऱ्हाडे म्हणाले, अहमदनगर शहर हे सुंदर खेडं आहे. येथे बोलली जाणारी भाषा रसाळ आहे. यामुळे माझ्या चित्रपटात ती वापरली आहे. येणारा काळ हा शेतकऱ्यांसाठी चांगला असेल. आपला विचार ठाम ठेवल्यास कुठलीही गोष्ट अशक्‍य नाही. लहानपणापासूनच वाचनाची आवड असल्याने छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्राने प्रेरणा मिळाली. राष्ट्रीय सेवा योजना ही बिन भिंतीची शाळा आहे. येथे शिक्षणाबरोबरच चांगले गुण शिकविले जातात. ज्या महाविद्यालयात मी शिक्षण घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचलो आहे, त्या महाविद्यालयाचे नाव जगात सर्वत्र पोहचविण्याचे माझे ध्येय आहे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधून आपल्या महाविद्यालयातील गंमती-जमती विद्यार्थ्यांना सांगितल्या.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)