शेतकऱ्यांनो सरकारला दमडीचीही ओवाळणी देऊ नका – राज ठाकरे 

मुंबई – शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढत सत्ताधाऱ्यांना पुन्हा एकदा लक्ष्य केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी व्यंगचित्राची मालिका सुरु केली असून पाडव्याच्या मुहूर्तावर आणखी एक व्यंगचित्र सादर केले आहे. या व्यंगचित्रातून भाजप आणि शिवसेना असे दोन्ही पक्षांवर निशाणा साधला आहे.

काय आहे व्यंगचित्र 
पाडवा (बलिप्रतिपदा) असे शीर्षक व्यंगचित्रास देण्यात आले आहे. या व्यंगचित्रात  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे असून या दोघांनीही साडीपरिधान केल्याचे दिसते आहे. शेतकरी जोडपेदेखील येथे बसलेले दाखवण्यात आले आहे.  दोघंही शेतकऱ्याला पाडव्यानिमित्त ओवाळायला आलेले असताना शेतकऱ्याची बायको त्याला दटावते की, ऐका, आताच सांगून ठेवते ! एक दमडी जरी टाकलीत ओवाळणी म्हणून, तर याद राखा!, असे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)