शेतकऱ्यांनो चिंता नको…

संग्रहित छायाचित्र...

खरीप हंगामासाठी बियाणे, खतांची मुबलक उपलब्धता


पीक विमा नोंदणी प्रक्रिया सुरु

मुंबई – शेतकऱ्यांनो खतं आणि बियाणांची चिंता करू नका. यंदाच्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडे बियाणे आणि खतांची कोणतीही कमतरता नाही. शेतकऱ्यांना गरजेनुसार त्याची पुर्तता केली जाईल, अशी ग्वाही कृषीमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. पीक विम्यासाठी नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी त्याचा वेळेत लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर कृषी विभागाचा अतिरिक्त भार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. हा पदभार स्विकारल्यानंतर पाटील यांनी आज कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजय कुमार तसेच कृषी विभागाचे अन्य अधिकाऱ्यांसोबत खरीप हंगामासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पीक विमा नोंदणी प्रक्रिया सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी जवळच्या “आपलं सरकार’ केंद्रामार्फत किंवा कर्ज घेतलेल्या बॅंकांमार्फत 24 जुलैपर्यंत पीक विम्यासाठी अर्ज करावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी पावसाचा अजूक अंदाज व जमिनीचा ओलावा विचारात घेऊनच पेरणीची प्रक्रिया सुरु करावी. तसेच, शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त आंतरपिके घेण्याला प्राधान्य द्यावे. शिवाय, खते आणि किटकनाशकांचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा, अशा सूचनाही पाटील यांनी यावेळी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)