शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानाचा लाभ घ्यावा

वाकी -शासनाकडून विविध योजना शेतकऱ्यांसाठी दिल्या जात असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शासकीय अनुदानाचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही, असे विचार जिल्हा परिषदेचे सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रमांतर्गत खेड तालुक्‍यातील कोहिंडे बुद्रुक, गारगोटवाडी, तळवडे येथील शेतकऱ्यांना बायोगॅससाठी जवळपास शंभर टक्के अनुदान मिळाले असून, यात केंद्र शासन, जिल्हा परिषद व खाजगी कंपनीचा सीएसआर निधीचा समावेश करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना अनुदान वाटप व बायोगॅसच्या प्रचार प्रसिद्धीसाठी शरद बुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यशाळेत मार्गदर्शन करताना बुट्टे बोलत होते. यावेळी खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे, गटविकास अधिकारी इंदिरा अस्वार, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार, खेड पंचायत समितीचे सदस्य चांगदेव शिवेकर, पाईट गावच्या सरपंच आशा सोनवणे, कृषी अधिकारी मनोज कोल्हे, ए. एन. मुल्ला, जी. व्ही. ढवळे, बॉस कंपनीच्या समाज विकास विभागाचे अधिकारी गणेश कुटे, आदींसह प्रकल्प अधिकारी, पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खेड तालुक्‍यातील 60 शेतकऱ्यांना यापूर्वी केंद्र सरकारकडून देण्यात येणारे प्रत्येकी 9 हजार रुपये अनुदान देण्यात आले होते. तर जिल्हा परिषदेकडून 10 हजार रुपये प्रमाणे पहिल्यांदाच शेतकऱ्यांना प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदान देण्यात आले. यासाठी बजेटच्या सर्वसाधारण सभेत शरद बुट्टे पाटील यांनी आग्रह धरला होता. त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींनी देखील 5 हजार ते 9 हजार रुपये अनुदान या शेतकऱ्यांना दिले. विशेष करून कोहिंडे बुद्रुक, गारगोटवाडी, तळवडे येथील शेतकऱ्यांना बॉस कंपनीच्या सीएसआर मधून 16 हजार 500 रुपये मिळाल्याने जवळपास बायोगॅससाठी खर्च केलेली शंभर टक्के रक्कम अनुदान म्हणून मिळाली आहे. आदिवासी भागात आदिवासी उपाय योजनेतून देखील 10 हजार रुपयांचे वाढीव अनुदान बायोगॅस करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळाले असल्याचे बुट्टे पाटील यांनी सांगितले.

  • बायोगॅस मुळे इंधनाची मोठी बचत होते. सध्या बांधकामा बरोबर सिंटेक्‍स कंपनीचा दोन तासांत जोडून चालू होणारा बायोगॅस देखील लावता येतो. वर्ष दोन वर्षात झालेला खर्च देखील वसूल होतो. आणि त्यावर अनुदान देखील मोठ्या प्रमाणावर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागात संपर्क साधून बायोगॅस तयार करावेत.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)