शेतकऱ्यांनी योजनांचा फायदा घ्यावा -काळभोर

लोणी काळभोर-लोणी काळभोर – थेऊर जिल्हा परिषद गटात पुणे जिल्हा परिषद व हवेली पंचायत समितीच्या वेगवेगळ्या योजना राबवून शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व योजनांचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर काळभोर यांनी केले आहे.
येथील पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना चारा पिकासाठी चारा वर्गीय बियाणांचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी युगंधर काळभोर बोलत होते. या वेळी पशुवैद्यकीय आधिकारी डॉ. बी. जे. तेजनकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली तालुका उपाध्यक्ष चंद्रकांत काळभोर, प्रसाद काळभोर, दत्तात्रय काळभोर, उत्तम काळभोर आदी उपस्थित होते. काळभोर म्हणाले, सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चारा निर्मितीसाठी प्रोत्साहन म्हणून मोफत बी -बियाणे वाटप करण्यात येत आहे. लोणी काळभोर परिसरातून 25 शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच किलो प्रमाणे ज्वारी व मक्‍याचे बियाणे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजन पशुवैद्यकीय आधिकारी डॉ. बी. जे. तेजनकर यांनी केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)