शेतकऱ्यांनी जिल्हा बॅंकेच्या योजनांचा लाभ घ्यावा

चोराडे ता. खटाव : येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या शाखेच्यावतीने जेसीबीचे वितरण करताना सरव्यवस्थापक एस. एन. जाधव त्यावेळी मान्यवर.

सरव्यवस्थापक एस. एन. जाधव : चोराडे शाखेतर्फे जेसीबीचे वितरण
वडूज, दि. 8 (प्रतिनिधी) – सहकाराच्या माध्यमातून शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या जीवनात प्रगती साधणारी जिल्हा बॅंक ही दुवा ठरली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी व ग्राहकांनी जिल्हा बॅंकेच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन बॅंकेचे प्रशासन विभागाचे सरव्यवस्थापक एस. एन. जाधव यांनी केले.
बॅंकेच्या चोराडे ता. खटाव येथील कक्ष शाखेतून जेसीबीचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय विकास अधिकारी उध्दव देशमुख, विकास अधिकारी जयवंत गोडसे, व्ही. व्ही. राजूरकर, सुधीर खाडे, राजेंद्र राऊत, शाखा प्रमुख प्रविण जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेतकरी व सर्वसामान्य लोकांच्या प्रगतीसाठी जिल्हा बॅंकेने विविध योजनांच्या माध्यमातून कायम प्रयत्नशील राहिली असल्याचे सांगून जाधव म्हणाले, शेतीसह अनेक शेतीपूरक जोडधंद्यांसाठीही बॅंकेने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. ग्राहकांनी बॅंकेच्या विविध योजनांची माहिती घेऊन त्यांचा लाभ घेऊन आपली प्रगती साधावी.
जयवंत गोडसे यांनी प्रास्ताविक केले. प्रविण जाधव यांनी आभार मानले. यावेळी तानाजी कोळेकर, विजय पिसाळ, संजय पिसाळ, नारायण पिसाळ, हणमंतराव पिसाळ, पोपट वाघमारे आदी उपस्थित होते.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)