लाखणगाव- आंबेगाव तालुक्‍यातील सातगाव पठार येथील शेतकऱ्यांनी नुकतीच जुन्नर येथील गोळेगाव व पिंपरी पेंढार येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) पुणे अंतर्गत प्रक्षेत्र भेट दिली. यावेळी सेंद्रीय शेती आणि गांडुळ खत प्रकल्पाची शेतकऱ्यांनी माहिती घेतली. परंपरागत कृषी विकास योजना (सेंद्रीय शेती) अंतर्गत गोळेगाव व पिंपरी पेंढार येथे भूसंवर्धन सेंद्रीय शेतकरी गट, कुरवंडी येथील शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोळेगाव येथील महिला बचत गटामार्फत मेझा, बिग बाजार, ग्रीन नेचर बास्केट यांचा पुणे व मुंबई येथे होणाऱ्या सेंद्रीय मालाच्या विक्री व उत्पादन पद्धतीबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. पिंपरी पेंढार येथील सेंद्रीय उत्पादक शेतकरी संजय कुटे यांच्या शेतावर प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी जिवामृत, दशपर्णी अर्क, गांडुळ खत निर्मिती व सेंद्रीय पद्धतीने पीक उत्पादन विषयी माहिती घेतली. सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी संजय विश्वासराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक गणेश पडवळ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)