शेतकऱ्यांनी आवाज उठवल्यानंतर पाण्याचा विसर्ग बंद

जावळी तालुक्‍यातील महू धरणातून नाहक पाण्याचा विसर्ग

लाखो लिटर पाणी वाया, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कुडाळ – जावली तालुक्‍यातील पाणीटंचाई लक्षात घेता धरणातील पाणी साठा पावसाळ्यापर्यंत योग्य नियोजन करून टिकवणे गरजेचे आहे. मात्र विनाकारण पाणी सोडून पाण्याची एकप्रकारे नासाडी सूरू असल्याचे निदर्शनास आले आहे. जावळी तालुक्‍यातील महू धरणातील साठवलेले पाणी अज्ञातांकडून सोडून देऊन मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळेच पाण्याचा प्रवाह नदी, ओढ्यात सोडला जात असल्याचा आरोप शेतकरी व नागरिकांमधून होत आहे.

गेल्या 21 वर्षांपासून जावलीच्या शेतकऱ्यांनी महू धरणातील पाणी आज न उद्या आपल्या शिवारांमध्ये येईल व शेतशिवार फुलेल या आशेवर घालवली आहेत. धरणाचे पाणी फिरल्यानंतर नक्कीच तालुक्‍यातील शेती सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल, असे स्वप्न उराशी बाळगून शेतकरी आजपर्यंत प्रतिक्षेत आहेत. आवश्‍यकता नसतानाही धरणातून पाणी नक्की कोण सोडून देते याबाबात संभ्रामवस्थेचे वातावरण आहे.

विनाकारण सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला असून ऐन उन्हाळ्यात धरणातील पाणीसाठा कमी होऊन पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्‍यता याप्रकारामुळे निर्माण झाली आहे. त्यामुळे महू धरणाबाबतया बेजबाबदार घटनेला जबाबदार कोण? असा सवालही निर्माण केला जात आहे.

मात्र, या प्रकारांमुळे महू धरणाला धोका निर्माण झाला आहे. वास्तविक धरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी अभियंत्याची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांचे याकडे दुर्लक्ष असल्याचे निदशर्नास येत आहे. यापूर्वीही एक वेळा धरणातून अशाच प्रकारे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक पाणी सोडण्यात आले होते. यामुळे नदीपात्रालगत असणाऱ्या लोकांना धोकाही पोहचू शकतो असाही, प्रश्‍न उपस्थित होत आहे.

काल अचानक सोडलेल्या पाण्याबाबत जनतेतून सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर काही तासानंतर सदरचे पाणी बंद करण्यात आले व पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला असला तरी सदरची बाब गंभीर असल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)