शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा

लोणी काळभोर- शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये दर्जेदार उत्पादन घेऊन आपले आर्थिक उत्पन्न वाढवावे, असे आवाहन पुण्यातील कृषी महाविद्यालयातील विस्तार विभागाचे प्रमुख डॉ. सुभाषचंद्र शिंदे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे मधील ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमा निमित्त कृषीकन्यांनी शास्त्रज्ञ-शेतकरी चर्चासत्र व कृषी प्रदर्शन कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे आयोजित केले होते. या वेळी डॉ. सुभाषचंद्र शिंदे बोलत होते. या वेळी प्रगतशील शेतकरी गोरख घुले, बापूसाहेब घुले, कोरेगाव मुळच्या सरपंच कविता काकडे, पेठच्या सरपंच कमल शेलार, डॉ. अरुण कांबळे, डॉ. रेणुका शिंदे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये डॉ. प्रमोद चौधरी यांनी आधुनिक पद्धतीने ऊस लागवड, डॉ. उत्तम होले यांनी हुमणी कीड नियंत्रण, डॉ. मंगल कदम यांनी विदेशी भाजीपाला व रोपवाटिका या विषयांवर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी प्रदर्शनामध्ये कृषीकन्यांनी आधुनिक उपकरणे, जीवाणू खते, नाडेप, बायोगॅस, शेततळे यांच्या प्रतिकृती प्रदर्शित केल्या होत्या. हा कार्यक्रम पांचाली गिरिगोसावी, रसिका जाधव, गिरिजा कडू, पल्लवी कदम, कलोरे श्‍वेता, कल्लुरू मोनिका, श्रद्धा कर्डक, प्राजक्ता लांडे, संजीवनी लोंढे, सुरेखा कांबळे, कृतिका केसवाणी, जान्हवी कोथमिरे, पर्णवी काकडे या कृषीकन्यांनी यशस्वीपणे आयोजित केला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)