उरुळी कांचन- शेतकऱ्यांनी शेतातील पिके घेण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी, असे मत कोरेगाव मुळ येथील सरपंच कविता काकडे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी महाविद्यालय, पुणे या अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम 2018-19 केंद्र कृषी विद्या विभाग येथील सात कृषी कन्या ग्रामीण भागात शेती कशी केली जाते, याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी संस्था व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव मुळ (ता. हवेली) या गावात आलेल्या असून, शेतीचा अनुभव घेत असताना येथील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती कशी करावी, या संदर्भात मार्गदर्शन करत आहेत, तसेच कृषी दिनानिमित्ताने उपस्थित विद्यार्थ्यांकडून मोठ्या उत्साहात कृषी दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी कृषी कन्या गिरिजा कडू, सारिका जाधव, पल्लवी कदम, पांचाली गिरीगोसावी, मोनिका कल्लुरु, श्वेता कल्लोरे, सरपंच कविता काकडे, उपसरपंच नारायण शिंदे, आप्पासाहेब शिंदे, विजय कानकाटे, शरद शितोळे, कचरू कड, सुधीर शितोळे, निखिल पवार, तंटामुक्ती अध्यक्ष मुकिंदा काकडे आदी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा