शेतकऱ्यांना 7 हजार सौर कृषीपंप 

– राज्य मंत्रिमंडळाची मान्यता 
– 239 कोटी 92 लाख खर्च अपेक्षित 
– 3 व 5 एचपीचे पंप मिळणार लाभार्थींना 
– आणखी 1 लाख सौर कृषी पंपासाठी नवीन योजना 
मुंबई: राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेली विजेची मागणी लक्षात घेता वीजनिर्मितीचे पर्यायी, शाश्वत स्रोत निर्माण करण्यासाठी राज्यात अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत 7000 सौर कृषी पंप वाटपास मंत्रिमंडळाने आज मान्यता दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली. त्यासाठी 239 कोटी 92 लाख रुपये खर्च येणार असून आणखी एक लाख सौर कृषी पंप देण्याची योजना तयार करण्यासाठीही यावेळी मान्यता देण्यात आली आहे.
शेतीसाठी कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात येणा-या अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना सुमारे साडे पाच हजार सौर कृषी पंप प्रायोगिक तत्वावर देण्यात आले होते. हा प्रकल्प यशस्वी झाल्यावर आता सात हजार सौर कृपी पंप देण्यात येणार आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निधीतून शेतक-यांना हे सौर कृषी पंप देण्यात येणार आहे. ही संपूर्ण योजना महाऊर्जाकडून राबविण्यात येणार आहे. याशिवाय राज्य शासनाद्वारे राज्यात 1 लाख सौर कृषी पंप आस्थापित करण्याकरिता नवीन योजना तयार करण्यास मंत्रीमंडळाची मान्यता देण्यात आली.
दुर्गम भागाला फायदा 
दुर्गम भागात वीज पुरवठा करण्यासाठी खूप खर्च येतो. पण सौर कृषी पंपांमुळे ठाणे, पालघर, मेळघाट, गडचिरोली भागातील शेतक-यांना फायदा होईल. सौर कृषी पंपामुळे शेतक-याला दिवसाही सिंचन करता येईल. या सौर कृषी पंपांमुळे सुमारे 14 हजार हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)