शेतकऱ्यांना हक्काचे पैसे न दिल्यास तीव्र आंदोलन

प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचा इशारा

कोरेगाव – कोरेगाव आणि खटाव तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे साखर कारखानदारांनी अडविले असून, शेतकऱ्यांना स्वत:चे पैसे मिळणे दुरापस्त झाले आहे. कारखानदारांनी शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी दिला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युवासेनेचे जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले, पंचायत समिती सदस्य मालोजी भोसले यांच्या पुढाकाराने आणि शेतकरी संघटनेच्या सहयोगातून साखर कारखानदारांच्या मनमानी भूमिकेच्या विरोधात सोमवारी कोरेगावात मोर्चा काढण्यात आला. मार्केट यार्डपासून सुरु झालेला मोर्चा जुना मोटार स्टॅंड येथे आल्यावर त्याचे सभेत रुपांतर झाले. यावेळी प्रा. बानुगडे-पाटील यांनी साखर कारखानदारांवर टिकेची झोड उठवली. शिवसेनेचे उपनेते आणि शेतकरी नेते लक्ष्मणराव वडले, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के, हणमंतराव जगदाळे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

रणजितसिंह भोसले व जीवन शिर्के यांनी आ. शशिकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून टिका केली. कोरेगाव आणि खटाव तालुक्‍यातील शेतकरी आज पैशांच्या प्रतिक्षेत असताना, आमदार कोणतीही भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला. राष्ट्रवादीतील घराणेशाहीवर रणजितसिंह भोसले यांनी जोरदार टिका केली. मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. तेथे तहसीलदार स्मिता पवार यांना निवेदन सादर करण्यात आले. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या नेत्तृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)