शेतकऱ्यांना हक्काचे पाणी, पिकांना भाव मिळू दे

निमगाव केतकी-इंदापूर तालुक्‍यासह महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शासनाची कर्जमाफी मिळू दे, चांगले प्रर्जन्यमान होऊ दे आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या हक्काचे पाणी, पिकाला चांगला भाव मिळू दे हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करत माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील सुवर्णयुग गणेश मंदिरातील सुवर्णयुगेश्‍वरास सकाळची महामंगल आरती करुन साकडे घातले.
याप्रसंगी निमगाव केतकीचे तंटामुक्‍त समितीचे अध्यक्ष दत्तात्रय चांदणे, अतुल मिसाळ, संदिप भोंग, महादेव शेंडे, विजय महाजन, ऍड. सचिन राऊत व सर्व तंटामुक्‍त समितीची पुन्हा एकदा निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार केला, तसेच तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 42 कि.वजन गटात यश निवृत्ती शेंडे तर 52 किलो वजन गटात पृथ्वीराज विश्‍वजित करे यांनी प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडुंचा सत्कार करण्यात आला व इंदापूर तालुका पत्रकार संघाच्या मुख्य प्रवर्तकपदी नानासाहेब चांदणे व सदस्यपदी जावेद मुलाणी यांची निवड झाली त्यांचाही सत्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी इंदापूर पंचायत समितीचे उपसभापती देवराज जाधव, सहकार महर्षी शंकरराव मोहीते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश मेहर, इंदापूर तालुका महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा शालन भोंग, सरपंच छाया मिसाळ, सुवर्णयुग ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, गणेश पतसंस्थेचे अध्यक्ष किशोर पवार, अष्टविनायक पतसंस्थेचे उपाध्यक्ष सचिन चांदणे, ग्रामपंचायत सदस्य सचिन मुलाणी, गोरख आदलिंग, अनिल भोंग, अर्जुन भोंग, भारत मोरे, कांतिलाल शेंडे, मधुकर भोंग, गणेश शेळके उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)