शेतकऱ्यांना सिंचन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन

दौंड तालुक्‍यातील थकबाकी असलेली गावे
दौंड शाखा, लिंगाळी, देऊळगावराजे, खोरवडी, शिरापूर, गोपाळवाडी, हिंगणीबेर्डी, गिरिम आदींचे सुमारे 50.26 लाख रुपये, बोरिबेल शाखा, देऊळगावराजे, गाडेवाडी, बोरिबेल, शिरापूर, आलेगाव, काळेवाडी, खोरवडी आदींचे सुमारे 14 लाख, भिगवण शाखा, राजेगाव, मलठण, वाटलूज, लोणारवाडी, स्वामी चिंचाली यांची सुमारे 15.3 लाख रुपये, तर रावणगाव शाखा, रावणगाव, नंदादेवी मळद, श्रीशुफळ, स्वामी चिंचाली, खडकी यांची सुमारे 71.79 लाख रुपये इतकी थकबाकी आहे. तरी, शेतकऱ्यांनी आपआपली थकबाकी त्वरीत भरावी, असे आवाहन जलसंपदा विभागाकडून केली आहे.

देऊळगावराजे – सध्या मार्चअखेर सिंचन पाणीपट्टी वसुलीसाठी अधिकारी दौंड तालुक्‍याच्या पूर्व भागात सगळीकडे फिरत आहेत. राज्य शासनाकडून सिंचन पाणीपट्टी वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना विनंती करीत आहेत. त्यासाठी शासकीय वाहनांना स्पिकरवरुन आवाहन करण्यात येत आहेत. तसेच शासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होऊ नये. तरी देखील 15 मार्चपर्यंत पाणीपट्टी वसुलीसाठी शेतकऱ्यांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नव्हता. आतापर्यंत सुमारे 7.44 लाख एवढी वसुली झाली आहे.

दौंड तालुक्‍यातील पूर्व भागाततील खडकवासला प्रकल्पतील नवीन मुठा उजवा कालव्याव्दारे शेती सिंचनसाठी आणि ओढ्या-नाल्याव्दारे पाणी दिले जात आहे. आवश्‍यक निधीअभावी कालवा, वितरिका नादुरुस्त असतानाही या विभागातील जलसंपदा विभागाचे उपविभाग दौंड अंतर्गत दौंड-बोरिबेल, भिगवण, रावणगाव या शाखा कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी दक्षता घेत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)