शेतकऱ्यांना वीज वितरणचा “करंट’

अव्वाच्या-सव्वा बिलाने शेतकरी हैराण
भारतीय मराठा महासंघ आंदोलनाच्या पवित्र्यात
वाई, दि. 6 (प्रतिनिधी) – महावितरणच्या अनागोंदी कारभाराचा वाई तालुक्‍यातील जनतेला अनेकदा फटका बसला आहे. याप्रकरणी जनतेतून असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असताना वीज वितरणकडून शेतकऱ्यांना भरमसाठ बिले आकारून चांगलाच करंट दिला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून वीजवितरणने आपला कारभार न सुधारल्यास रस्त्यावरुन उतरुण तीव्र आंदोलन करु, असा इशारा मराठा महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे.
महावितरणाच्या अनागोंदी कारभारामुळे पोलीस जवानाचा शेतीला पाणी देत असताना विद्युत वाहक तार अंगावर पडून मृत्यू झाला होता. तसेच एका म्हैशीसह महावितरणाच्या अनेक कर्मचाऱ्याचा काम करीत असताना लाईटचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. तालुक्‍यात अनेक ठिकाणी लाईटचा शॉक बसून मृत्यू ओढावल्याची घटनाही ताज्या आहेत. तसेच तालुक्‍यातील सर्वसामान्य जनता महावितरणाच्या भरमसाठ येणाऱ्या लाईट बिलांना अक्षरशः वेतागली आहे. सर्वसामान्य जनतेचा प्रश्न मराठा महासंघाने हाती घेतला असून महावितरणाच्या भोंगळ कारभाराबाबत जाब विचारण्यासाठी महावितरणाचे विभागीय कार्यकारी अभियंता अविनाश खुस्पे यांना लेखी निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात असेही म्हटले आहे की, वादळी वाऱ्यामुळे वाई तालुक्‍यातील अनेक ठिकाणच्या लाईटच्या वायरी तुटून पडल्या आहेत. तर कित्येक ठिकाणच्या वायरी या शेतातील पिकांना घासून जात आहेत. त्या दुरुस्त न केल्याने तालुक्‍यातील शेतकरी मरण समोर ठेवून वावरत आहे. तर कित्येक गावातीललाईट अनियमित चालू राहत असल्याने शेतीचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महावितरणाच्या या भोंगळ कारभाराविरुध्द मराठा महासंघ संघाचे जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. अनियमित लाईटचे लोड शेडींग चालू आहे, शेतीला पाणी मिळत नसल्याने बागायती शेतीचे मोठे नुकसान होत असून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. महावितरणला याबाबत विचारणा केली असता अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असून कर्मचारी संख्या कमी असून साठ कर्मचाऱ्यांची गरज असताना फक्त पंचवीस कर्मचारी सध्या कार्यरत आहेत. तरी महावितरण कंपनीने त्वरित कर्मचारी संख्या समस्या दूर करावी व लोकांच्या जीवाशी खेळण्याचा खेळ थांबवावा. अन्यथा वाई तालुक्‍यातील शेतकरी, ग्राहक, भारतीय मराठा महासंघाच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारतील याची नोंद महावितरणने घ्यावी, असाही इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष सुनील मांढरे, तालुकाध्यक्ष विकास यादव, उपाध्यक्ष विजय मांढरे, सचिव शशी निंबाळकर, जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष मकसूद शेख, गौरव सुर्वे, प्रशांत कचरे, किरण किरवे, विशाल म्हस्के, मोहित सपकाळ, गुरु निंबाळकर, सचिन दाभाडे यांच्या सह्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)