शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचे सरकारचे धोरण- धनंजय मुंडे

मुंबई: मागच्या 15 दिवसांत मुख्यमंत्री सातत्याने मुंबई, बिल्डरांचे एफएसआय, टीडीआर, नाशिकची मेट्रो, हिंजवडीची मेट्रो यासारख्या विषयांवर बोलत आहेत, मात्र मराठवाडा आणि राज्यातील बळीराजा ज्या दुष्काळाने होरपळून निघत आहेत, त्यांच्याबद्दल मी वारंवार मागणी करूनही एक चकार शब्दही का बोलत नाहीत ? शेतक-यांना वा-यावरच सोडण्याचे सरकारचे धोरण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली.

मराठवाडाच नाही तर संपूर्ण राज्यात भीषण, अभूतपूर्व दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकारने कागदे न रंगवता तातडीने दुष्काळ जाहिर केला पाहिजे, शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. नाहीतर बळीराजा जगणार नाही, असेही मुंडे म्हणाले.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)