शेतकऱ्यांना रास्त भाव देणं ही सरकारची जबाबदारीच –  जयंत पाटील

मुंबई: परभणी येथील सेंद्रिय भाजीपाला बाजार उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी रास्तभाव हे शेतकऱ्यांचे रडगाणेच असे निषेधार्ह वक्तव्य करत शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळले. गुलाबराव पाटील यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निषेध केला आहे. शेतकऱ्यांना रास्तभाव देणे ही सरकारची जबाबदारीच आहे, असे मत पाटील यांनी मांडले आहे.

शेतकऱ्यांकडे भाजप सरकारचे होणारे दुर्लक्ष वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून अधोरेखित होते आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पीकाला दर मिळत नाहीत. तशातच अशी बेजबाबदार वक्तव्ये मंत्र्यांकडून होतात, त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे नाही याची खूणगाठ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी बांधावी, असे वक्तव्य पाटील यांनी केले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)