शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देण्यासाठी व्यापक कृषी सुधारणा – पंतप्रधान 

  देशातल्या 22 हजार “ग्रामीण हाट’ला आवश्‍यक पायाभूत सुविधा

नवी दिल्ली – शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य मूल्य मिळण्याची खातरजमा करण्यासाठी देशभरात व्यापक कृषी सुधारणा हाती घेण्यात येत आहेत. यासाठी खेड्यातील स्थानिक मंड्या, घाऊक बाजारपेठांशी आणि त्यानंतर जागतिक बाजारपेठांशी जोडत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

आकाशवाणीवरुन प्रसारित झालेल्या “मन की बात’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. नरेंद्र मोदी म्हणाले, देशातल्या 22 हजार “ग्रामीण हाट’ला आवश्‍यक पायाभूत सुविधा पुरवण्यात येत आहे. त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि ई-नाम प्लॅटफॉर्मशी त्या एकीकृत करण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा कृषी माल विकण्यासाठी दूरवर जावे लागणार नाही, असे त्यांनी सांतिगले. शेतकऱ्याला त्याच्या पिकासाठी उचित मूल्य मिळावे यासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अधिसूचित पिकांसाठी त्यांच्या मूल्यांच्या किमान दीडपट किमान आधारभूत किंमत निश्‍चित करण्यात येईल, असे पंतप्रधान म्हणाले.

स्वस्थ भारत अर्थात आरोग्यपूर्ण भारतासाठी सर्व मंत्रालये काम करत आहेत. यासाठी परवडणाऱ्या दरात आरोग्यसेवा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. प्रतिबंधात्मक उपाय हा सर्वात कमी खर्चाचा आणि सोपा मार्ग असल्याचे त्यांनी नमूद केले. देशभरात आरोग्य वेलनेस सेंटर उभारण्यात येत असून, निरोगी राहण्यासाठी स्वच्छताही सर्वात आवश्‍यक बाब आहे. स्वच्छतेची व्याप्ती दुप्पटीने वाढून ती 80 टक्के झाल्याचे पंतप्रधान म्हणाले. देशभरात तीन हजार जन औषधी केंद्र उघडण्यात आली असून, तिथे 800 पेक्षा जास्त औषधे माफक दरात उपलब्ध आहेत. या जनऔषधी केंद्रांची माहिती गरजुंना द्यावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पुढच्या महिन्यात 14 तारखेला येत असल्याचे स्मरण करुन, उद्योग हे गरिबातल्या गरिबाला रोजगार मिळवून देण्याचे प्रभावी साधन असल्याचे बाबासाहेबांनी काही वर्षापूर्वी सांगितले होते, असे पंतप्रधान म्हणाले. बाबासाहेबांच्या जयंतीदिनापासून यावर्षीच्या 5 मे पर्यंत ग्राम स्वराज अभियान राबवण्यात येणार आहे. याअंतर्गत देशभरात ग्रामविकास, दारिद्रय निर्मुलन आणि सामाजिक न्याय विषयक विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांनी नागरीकरणावर भर दिला होता त्याच अनुषंगाने केंद्र सरकार स्मार्ट सिटी आणि अर्बन मिशन राबवत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)