शेतकऱ्यांना मिळाली नाममात्र दरात अवजारे

तळेगाव ढमढेरे येथे शेतकरी अवजार बॅंकेचे उद्घाटन

तळेगाव ढमढेरे- तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे तालुका कृषी विभाग, जॉन डीयर कंपनी तसेच कोई फाउंडेशन ट्रस्ट यांच्या वतीने समृद्ध प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांसाठी औजार बॅंक नाममात्र दरामध्ये उपलब्ध करून दिली आहेत. या बॅंकेचे उद्‌घाटन श्रीराम शेतकरी मंडळ यांनी केले होते. तळेगाव ढमढेरे व परिसरातील 9 गावांसाठी शेतकरी बॅंकेचे लोकार्पण सोहळा पार पडला.
येथील बॅंकेत शेती उपयोगी ट्रॅक्‍टरचलित व हस्तचलित अवजारांचा समावेश आहे. ज्या शेतकऱ्यांना औजाराची गरज प्रत्येकवेळी लागत नाही. काम झाल्यानंतर ते अवजार शेतकऱ्यांकडे पडून राहते. पण खरेदी करताना एवढी मोठी रक्‍कम द्यावी लागते. त्याचा उपयोग काही कालावधी करताच होतो. त्यामुळे शेतकरी सर्व अवजार खरेदी करू शकत नाही. अशा शेतकऱ्यांना या बॅंकेचा फायदा होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना अवजारांची गरज भासणार आहे. त्यांना नाममात्र भाडेतत्त्वावर वापरण्यासाठी मिळणार आहे. यामध्ये ऊस लागवड यंत्र, खोडके कटिंग व खत पेरणी यंत्र, एक डोळा काढणीचे यंत्र, पावर वीडर, खते देण्याची पहार आदी अवजारे बॅंकेत ठेवली आहेत. औजार बॅंकेसाठी विनामोबदला जागा जयकुमार ढमढेरे यांनी उपलब्ध करून दिली आहेत. यावेळी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले. जॉन डियरचे मॅनेजर मथुरा चौधरी यांनी प्रास्ताविक केले. ज्युनियर कंपनीचे प्रतिनिधी पवार यांनी मार्गदर्शन केले, माजी सभापती आरती भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. ग्रामसेवक संघटनेचे माजी मानद अध्यक्ष श्रीकांत ढमढेरे व ग्रामपंचायत सदस्य गोविंद ढमढेरे यांनी मनोगत व्यक्‍त केले.
तालुका कृषी अधिकारी संजय पिंगट म्हणाले की, अवजार बॅंक प्रत्येक गावात तयार व्हावी. राज्य शासन कृषी विभागामार्फत यांत्रिकीकरण योजनेतून भरपूर अवजारे शेतकऱ्यांना अनुदानावर दिलेली आहेत. अजूनही पुढील वर्षाच्या कोट्यात गटातील शेतकरी अर्ज करून अवजारे अनुदानावर घेऊ शकतात. अवजार बॅंक स्थापन करू शकतात तसेच एक डोळा ऊस रोपे निर्मितीसाठी नर्सरी शेडनेट हाऊस पॉली हाऊस ठिबक सिंचन आदी विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घनश्‍याम तोडकर यांनी केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक सचिन पाटील, कृषी सहायक अशोक जाधव, रोहिणी चौधरी, भाऊसाहेब बामदाळे, तळेगाव परिसरातील शेतकरी उपस्थित होते. चेतना ढमढेरे यांनी आभार मानले.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)