शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर कार्यशाळांचे आयोजन करा

ना. रामराजे : बाजार समितीत विविध उपक्रमांचा शुभारंभ

फलटण, दि. 28 (प्रतिनिधी) – फलटण तालुका बाजार समितीमार्फत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी राबवलेले उपक्रम स्त्युत्य आहेत. आगामी काळात तालुक्‍यातील शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरणाऱ्या कार्यशाळांचे आयोजन बाजार समितीने करावे, अशी अपेक्षा विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केली.
फलटण बाजार समितीमध्ये विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. आ. दीपक चव्हाण, बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समितीच्या सभापती सौ. रेश्‍माताई भोसले, उपसभापती शिवरुपराजे खर्डेकर, नगराध्यक्षा सौ. निता नेवसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटण दूध संघाचे चेअरमन धनंजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
ना. रामराजे म्हणाले, फलटण तालुक्‍यात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. मात्र, ऊस पिकासाठी जास्त पाणी वापरल्याने जमिनी खराब होत चालल्या आहेत. जमिनींचा पोत टिकवायचा असेल तर ऊस पिकाला पर्याय तयार करणे गरजेचे आहे. इतर फळबागांची लागवड शेतकऱ्यांनी करावी. तालुक्‍यातील कारखानदारांची स्थिती पाहता नवीन पिढीसाठी काहीतरी वेगळे करुन ठेवले पाहिजे. बाजार समितीने तालुक्‍यात गावोगावी जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना सर्व परिस्थिती समजण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा घ्याव्यात, अशी सुचना ना. रामराजे यांनी केली.
रघुनाथराजे म्हणाले, बाजार समितीच्या माध्यमातून सर्व संचालक व कर्मचारी वर्गाच्या सहाय्याने आपण वेगवेगळे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न करत आहे. तालुक्‍यात सध्या 96 हजार 100 शेतकरी आहेत. तालुक्‍यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा काढण्याचे प्रयत्न आहेत. आगामी काळात बाजार समितीत 125 बेडचे हॉस्पिटल आपण उभारणार आहोत. तसेच जय जवान, जय किसान योजनेद्वारे सैनिकांचे व त्यांच्या पाल्यांचेही प्रश्‍न याबाबतही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोहन डांगे, रामदास कदम, यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक सचिव शंकर सोनवलकर यांनी केले.
महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे, प्रा. भिमदेव बुरुंगले, विजय शेंडगे, लायन्स क्‍लबचे अध्यक्ष दिलीप गुंदेचा, नितीन मदने, विलासराव नलवडे, परशुराम फरांदे, मोहनराव निंबाळकर, महादेव चव्हाण, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, दिलीप अडसूळ, बाळासाहेब सांगळे, शरद भोइटे, सुदाम सुळ, जगन्नाथ कुंभार, जयकुमार इंगळे, संजय देशमुख, दादासाहेब नरुटे आदी मान्यवर उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)