शेतकऱ्यांना भातपीक लागवडीचे धडे!

कान्हे : येथे "यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड' या विषयावर आत्माचे प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
  • कृषी : यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड प्रशिक्षण संपन्न

वडगाव – महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापण यंत्रणा (आत्मा) अंतर्गत साई सेवाधाम ट्रस्ट, कान्हे येथे “यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड’ या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी आत्माचे प्रकल्प उपसंचालक अनिल देशमुख, तालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबीरे, व्ही. एस. टी टीलर्स ट्रक्‍टर्स पुणे जिल्ह्याचे अधिकृत विक्रेते प्रदीप औताडे व कृषि विभागाचे सर्व अधिकारी व मावळ तालुक्‍यातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

-Ads-

तालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबीरे यांनी उपस्थितांचे स्वागत करून यंत्राद्वारे भात लागवड याबाबत थोडक्‍यात माहिती दिली. त्यानंतर आत्मा अंतर्गत गतवर्षी राबविण्यात आलेल्या यशस्वी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडी बाबत पुंडलिक जोरी व बजाबा मालपोटे यांनी आपले अनुभव सांगितले.

या वेळी मावळ तालुक्‍यातील तीन भात लागवड यंत्र खरेदी केलेले शेतकरी पुंडलिक जोरी, तुकाराम लष्करी व नथु घारे यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर देशमुख यांनी आत्मा सन 2018-19 मध्ये सुमारे 100 एकर क्षेत्रावर घेण्यात येणाऱ्या यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड प्रात्यक्षिकाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

या वेळी शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवड कशी केली जाते याचे “व्हिडिओ’ दाखविणेत आले. तसेच यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करणेसाठी भात रोपवाटिका कशी तयार करावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड कशी होते व त्याचे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले व शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नांची उत्तरे देशमुख यांनी दिली. या कार्यक्रमाचे नियोजन तालुका कृषी अधिकारी विनायक कोथिंबीरे यांच्या मार्गदर्शनाखाली “आत्मा’चे राहुल घोगरे यांनी केले होते.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)