शेतकऱ्यांना फक्त ‘राजा’ म्हणायचे!

सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत म्हणून जाब विचारण्यासाठी लाखो शेतकऱ्यांनी थेट दिल्ली गाठली. मात्र शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अहिंसा दिनी बळाचा वापर केला. या निमित्ताने मोदी सरकारचा ढोंगीपणा व खरा चेहरा समोर आला आहे. यावरून हे सरकार शेतकरी विरोधी असून भांडवलदार धार्जिणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

उभ्या जगाचा पोशिंदा, बळीराजा म्हणून गुणगान गायचे आणि अनाथाला राजा बनवून व्यर्थ दर्प वाढवायचा. शेतकरी कधी राजा होता का? कधीच नव्हता त्याच्या नशिबी आले ते नेहमी अडचणी , संकट पण तो प्रजेच्या भरवश्‍यावर कधी जगलाच नाही. आता मात्र वेळ आहे शेतकऱ्यांसोबत चालेला खेळ थांबवण्याची.

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या मुहूर्तावर आपला हक्क मागण्यासाठी उत्तर प्रदेश मधून दिल्लीत धडकलेल्या शेतकऱ्यांवर निर्दयी सरकारने लाठीचार्ज केला. ज्यांच्यामुळे भाजप सरकार सत्तेचे तूप खात आहे. त्यांच्यावरच लाठीहल्ला केला, रक्तभांबाळ होईपर्यंत दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना तुडविले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘जय जवान जय किसान’चा नारा देणारे लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करत होते. तर दुसरीकडे त्यांच्याच हुकूमाखाली चालत असलेल्या कृषिप्रधान भारत देशात शेतकऱ्यांवर हल्ला केला गेला.

-Ads-

स्वातंत्र्यनंतर 52 टक्के मुख्य व्यवसाय शेती होता. अन्य कोणता उद्योग अस्तित्वात नव्हता. तसेच तेव्हा भूक हा मोठा प्रश्न होता तो सोडवण्यात शेतकऱ्यांचा मोठा वाटा. पण आज तोच शेतकरी गरीब आहे. सरकार विविध योजनांचा गाजावाजा करते. पण वास्तविक चित्र मात्र वेगळंच आहे. कारखान्याला पूर्ण वेळ वीजपुरवठा शेतकऱ्यांला मात्र रात्री वीज मिळते. आज शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही. जो आहे त्यातही दलालांची भागीदारी. त्याच्या मालाला भाव असतो पण पीक शेतात असतं तेव्हा एकदा का पीक शेताच्या बाहेर आलं भाव जमिनीवरच पडतात. यालाही जबाबदार शेतकरीच का?

कधी कधी प्रश्न पडतो खरच हे राजकारणी शेतकऱ्यांचे विचार करत असतील तर, गेली वर्ष हे शेतकऱ्यांला सुखी करू शकले नाही. फक्त घोषणाच शेतकऱ्यांना समृद्ध करण्याच्या. खरच खुप निर्दयी म्हणावे लागेल या सरकारला उद्योगक्षेत्राला मोठया प्रमाणात कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना मात्र आत्महत्या करावी लागते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीपासून अजूनही लाख शेतकरी वंचित आहेत. सरकारने लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली होती. मात्र आतापर्यंत फक्त लाख शेतकऱ्यांच कर्जमाफी मिळाली आहे. घोषणाबाजीत अव्वल असणाऱ्या सरकारने लाख शेतकऱ्यांना हजार कोटी रुपयांची कर्जमाफीची योजना जाहीर केली. त्यांची भारतभर जाहिरात देखील केली. आता खरीप हंगाम देखील संपत आला आणि विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी भर पावसाळ्यात दुष्काळाचा सामना करत आहे. तरी देखील त्यांना कर्जमाफी मिळाली नाही.

उत्तर प्रदेश मधील शेतकऱ्यांचे काय चुकले ?

सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादनावर दीडपट हमीभाव देऊन शेतकऱ्यांची कर्ज माफी करु, अशी आश्‍वासने दिली होती. मात्र सत्तेवर आल्यावर त्यांना आश्‍वासनांचा विसर पडला. त्यामुळे भारतीय किसान युनियनने किसान क्रांती यात्रा आयोजित केली. आणि सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत म्हणून जाब विचारण्यासाठी थेट दिल्ली गाठली. मात्र या यात्रेत सहभागी झालेल्या लाखो शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अहिंसा दिनी बळाचा वापर केला. स्वतःचे हक्कासाठी लढणे चुकीचे आहे का? फक्त शेतकऱ्यांची आंदोलने चुकीचे आहेत का ? शेतकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता, त्यांची अडवणूक करणे चुकीचे नाही का ? हे सर्व प्रश्न निर्माण होतात. या निमित्ताने मोदी सरकारचा ढोंगीपणा व खरा चेहरा समोर आला आहे. हे सरकार शेतकरी विरोधी असून भांडवलदार धार्जिणे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्वतःचे राजकीय अस्तितव टिकवण्यासाठी राजकीय मंडळींनी मोर्चे आंदोलने केली तर चालतात मग शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरला तर लाठीचार्ज केला जातो, अश्रूधारांच्या नळकांड्या फोडल्या जातात. भाजप असो वा कॉंग्रेस सर्व राजकीय नेत्यांना सत्तेवर आले की माज येतो, हे आता सत्य आहे. शेतकऱ्यांच्या भरवशावर सत्तेत यायचं नंतर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं. मग शेतकऱ्यांकडे लक्ष देण्याचे काम विरोधी पक्षांचे, भाजपने विरोधात असताना शेतकऱ्यांचा मागण्यांसाठी, शेतकरी दिंडी काढली आता कॉंग्रेसने संघर्ष यात्रा काढली. मात्र स्वतःची राजकीय मतांसाठी जाहिरातबाजी सोडून याना काही साध्य करता आले नाही. सर्वच राजकीय पक्ष एकाच माळेचे मणी, असे म्हटले तर गैर ठरणार नाही.

– संदीप कापडे

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)