शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कटिबध्द : आ. बाळासाहेब पाटील

मसूर, दि. 6 (प्रतिनिधी) – स्व. यशवंतरावजी चव्हाणसाहेबांच्या विचाराने सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली व त्याची संपूर्ण जबाबदारी स्व. पी. डी. पाटीलसाहेबांकडे सोपविली. त्यांनी ती जबाबदारी अतिशय कुशलतेने सभासद शेतकरी यांच्या हितासाठी जोपासली. त्याच विचाराने कार्यक्षेत्रातील सर्व सभासद शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी मी कटिबध्द आहे, असे प्रतिपादन आ. बाळासाहेब पाटील यांनी केले.
होळीचा गाव, ता. खटाव येथे विविध विकास कामांच्या भूमीपुजन व उद्‌घाटन समारंभ आणि नवनिर्वाचित उपसरपंच धनंजय माळवे यांचा सत्कार अशा संयुक्तिक कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. सभापती शिवाजीराव सर्वगौड, उपसभापती सुहास बोराटे, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे, शाखा अभियंता कुलकर्णी, संचालक संजय जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले की, सध्याच्या सरकारमधील मित्रपक्षांचे एकमेकांशी जुळत नसल्याने त्यांची प्रशासनावर पकड राहिलेली नाही. यामुळे विकासकामांवर परिणाम होत आहे. शासन कोणतेही निर्णय तातडीने घेत नाही. त्यामुळे इथून पुढच्या काळात आपआपले मतभेद विसरुन गावाच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्र यावे, असे आवाहन आ. पाटील यांनी यावेळी केले.
सभापती शिवाजीराव सर्वगौड यांचे भाषण झाले. नवनिर्वाचित उपसरपंच धनाजी माळवे व गावातील जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. उपसभापती सुहास बोराटे, जिल्हा परिषद सदस्य मानसिंगराव जगदाळे यांनी मनोगत व्यक्‍त केले. प्रास्ताविक भाऊसाहेब लादे यांनी केले. पांडुरंग शिंदे यांनी आभार मानले. पांडुरंग माने-गुरुजी, विलासराव शिंदे, मनोज जगदाळे, दाऊद पटेल, रसिद पटेल, जयवंत सरनोबत, इस्माईल पटेल, सरपंच अविनाश शिंदे, महेंद्र देशमुख, शिवाजी शेळके यांचेसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)