‘शेतकऱ्यांना देशातील सर्वात मोठी कर्जमाफी शरद पवारसाहेबांनी दिली’

पंढरपूर: देशातील शेतकऱ्यांना स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठी कर्जमाफी कुणी दिली असेल, तर ती तुमचे- माझे नेते शरद पवारसाहेबांनी दिली आहे. जवळजवळ ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकर्‍यांना मिळाली, परंतु आजच्या भाजपा सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी अद्यापही राज्यातील शेतकऱ्यांना मिळालेली नाही, असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी भोसे येथील निर्धार सभेत केला.

आश्वासने पूर्ण न करणारे हे सरकार असून देशातील संस्थात्मक रचना मोडीत काढण्याचे काम या सरकारने केले आहे, असे सांगतानाच वाचाळवीर आणि महिलांबद्दल अपशब्द काढणार्‍या भाजप आमदारांचा खरपूस समाचारही त्यांनी घेतला.

-Ads-

कष्ट करणार्‍या शेतकऱ्यांच्या हातात पैसे द्यायला हे सरकार तयार नाही. शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळाला तरच ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी असलेला नियोजन आयोगही नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर बंद केला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून मनमानी खर्च करण्याच्या परवानग्या राज्यांना मिळू लागल्या असून त्याचे पहिले उदाहरण बुलेट ट्रेनचे आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)