शेतकऱ्यांना दिलासा; कृषी विभागाने अनुदान वाढविले

दोन हजार लाभार्थींना होणार फायदा : “डीबीटी’ योजना फायद्याची

पुणे – जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या “डीबीटी’ योजनेअंतर्गत तब्बल 84 टक्के लाभार्थींची खरेदी पूर्ण झाली आहे. तर, अनुदानात पावणेदोन कोटींची वाढ झाल्याने आणखी दोन हजार लाभार्थींना याचा फायदा घेता येणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृषी विभागाकडून “डीबीटी’अंतर्गत पंपसंच, पीव्हीसी पाइप, एम.एम.एच.डी.पी.ई.पाईप, बॅटरी स्प्रेपंप, एचटीपी स्प्रेपंप ऑईल इंजिनसह, प्लॅस्टिक क्रेटस नग, ताडपत्री, सायकल कोळपे, ट्रॅक्‍टरचलित दोन फाळी सरी रिजर, इलेक्‍ट्रिक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह आणि गांडूळखत निर्मिती संच याचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी 5 कोटी 52 लाख 85 हजार 475 रूपये निधीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातून प्रस्ताव मागवण्यात आले. आलेल्या प्रस्तावामधून 8 हजार 720 लाभार्थींची निवड करण्यात आली असून, त्यांना वस्तू खरेदी करण्यास सांगितले. त्यामध्ये आतापर्यंत 6 हजार 461 लाभार्थींनी औजारांची खरेदी केली असून, 2 हजार 259 लाभार्थींनी खरेदी अजून केलेली नाही.

जिल्ह्यात दुष्काळपरिस्थिती आहे. त्यात शेतीसाठी औजार खरेदी करायचे म्हटले, तर शेतकऱ्यांसमोर पैशांचा मोठा प्रश्‍न निर्माण होतो. अशा परिस्थितीत “डीबीटी’ योजनेतून पंपसंच आणि पीव्हीसी पाईपला नागरिकांनी अधिक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हे वाढीव अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुदानामुळे गरजू शेतकऱ्यांना औजारे मिळण्यास मदत होणार आहे.

– विश्‍वासराव देवकाते, अध्यक्ष जिल्हा परिषद पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)