शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खते उपलब्ध करून द्या -पालकमंत्री संजय राठोड

वाशिम – आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे व खते उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी कृषि विभागाने विशेष खबरदारी घ्यावी, अशा सूचना महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिल्या. जिल्हा नियोजन सभागृहात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख, आमदार अमीत झनक, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती विश्वनाथ सानप यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खरीप हंगामाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या तयारी विषयी माहितीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी यावेळी सादरीकरण केले.

राठोड यावेळी बोलताना म्हणाले की, खरीप हंगामात पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे व खते उपलब्ध होण्यासाठी परिपूर्ण नियोजन करावे. तसेच या दरम्यान बोगस बियाणे, खते विक्रीस येण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा  विक्रेत्यांवर कारवाई  करावी. खरीप हंगामापूर्वी शेतकऱ्यांना मशागत व पेरणीसाठी पैसा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने सर्व बँकांनी पीक कर्ज वाटपाला गती देण्याची आवश्यकता आहे. याकरिता जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा अग्रणी बँकेने पुढाका घ्यावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)