शेतकऱ्यांना कर्ज योजनेतून जेसीबीसाठी कर्जवाटप

चोराडे : चोराडे शाखेतून थेट कर्ज योजनेतून धनादेश देताना एस.एन.जाधव, समवेत इतर मान्यवर.

म्हासुर्णे, दि. 23 (प्रतिनिधी) – सातारा जिल्हा बॅंकेच्यावतीने शेतकऱ्यांना थेट कर्ज योजनेतून विविध प्रकारची व्यवसायिक कर्जे घेता येतील. यासाठी या योजनेचा लाभ घेणे गरजेचे असल्याचे मत यांनी बॅकेचे सरव्यवस्थापक एस.एन.जाधव यांनी मांडले.
चोराडे, ता. खटाव येथील थेट कर्जवाटप योजनेतून जे.सी.बी चा धनादेशवाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. विभागीय विकास अधिकारी यु. के. देशमुख, व्ही. व्ही. राजुरकर, एस.आर. खाडे, जे. वाय. गोडसे, आर. एम. राऊत, शाखाप्रमुख पी. आर. जाधव, सरपंच विठोबा पिसाळ, चेअरमन हणमंत पिसाळ, ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिसाळ, सचिव संजय पिसाळ, सचिव विजय पिसाळ आदींची प्रमुख उपस्थित होती.
जाधव म्हणाले, चोराडेतील शाखेमार्फत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जाणार असून शेतकऱ्यांना कर्जपुरवठा केला जाईल. शेतीपुरक व्यवसायांना आर्थिक कर्जपुरवठा करण्यात येईल.
यावेळी बॅकसेवक पी. एस. वाघमोडे, डॉ. तानाजी कोळेकर, सुनिल जानकर, तेजस कोळेकर, संजय पिसाळ, सचिव संजय कुकले, अंकुश पिसाळ, शामराव पिसाळ, आण्णासो पिसाळ, भिमराव पिसाळ, संजय चव्हाण,महेश पिसाळ आदी ग्रामस्थ व खातेदार उपस्थित होते.

 


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)