‘शेतकऱ्यांना अटक करणारे फडणवीस सरकार ब्रिटिश मनोवृत्तीचे’

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या धुळे दौऱ्यावर आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीच्या दौऱ्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मंत्रालयात आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या पत्नी आणि मुलाला ताब्यात घेतले आहे. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी जोरदार टीका केली आहे.

धनंजय मुंडेंनी म्हंटले कि, मुख्यमंत्र्यांच्या दौ-यात अडथळा नको म्हणून मंत्रालयात आत्महत्या करणा-या धर्मा पाटील यांच्या वयोवृद्ध पत्नी आणि मुलाला अटक करणे म्हणजे तर फडणवीस सरकारची ब्रिटिश मनोवृत्ती दाखवून देते. सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध, अशी टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, संपादित जमिनीच्या मोबदल्यासाठी मंत्रालयात खेटे घालणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विखरणच्या धर्मा पाटील यांनी २२ जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)