शेतकऱ्यांच्या हक्काची जिल्हा बॅंक

रेडा- लहान- मोठ्या शेतकऱ्यांना हक्काचा आर्थिक आधार देणारी बॅंक ही पुणे जिल्हा मध्यवर्ती आहे. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांमध्ये कधीच भेदभाव न करता सेवा देण्याचे काम जिल्हा बॅंकेतूनच होते, असे प्रतिपादन इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी केले.
इंदापूर तालुक्‍यातील काटी गावात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या नुतन शाखेचे उद्‌घाटन आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी जगदाळे बोलत होते. याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, पंचायत समिती सदस्य सतीश पांढरे, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य सचिन आरडे, विलास वाघमोडे, हनुमंत कोकाटे-पाटील, सोमेश्‍वर वाघमोडे, साहेबराव मोहिते, विष्णू पाटील, सचिन देवकर, वैभव वाघमोडे, सुधीर यादव, हनुमंत बोराटे, मोहन गुळवे, विष्णू जाधव, हेमंत वाघमोडे, डॉ. शरद पडसळकर, प्रा. बाळासाहेब लोखंडे, एस. व्ही. भोसले, दत्तात्रय माने व जिल्हा बॅंकेच्या अधिकाऱ्यांसह नागरिक उपस्थित होते.
सभापती आप्पासाहेब जगदाळे म्हणाले की, काटी परिसरातील शेतकऱ्यांना जिल्हा बॅंकेच्या कामासाठी इंदापूरला जावे लागत असल्याने त्रास होत होता. मात्र, आता नागरिकांची या त्रासातून मुक्‍तता झाली असून शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आपल्या ठेवी या बॅंकेत ठेवून आपली पत वाढवली पाहिजे. तसेच विकास संस्थाचे घेतलेले कर्ज वेळेत परतफेड केले तर कर्ज पुरवठा करण्यासाठी जिल्हा बॅंकेला कधीच अडचणी येत नाहित, त्यामुळे आपल्या कडील कर्ज वेळेत परतफेड केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. इंदापूर तालुक्‍यातील गावागावांत विकास सोसायटीचे जाळे आहे; परंतु सचिव त्याप्रमाणात उपलब्ध नाहीत, शासन स्तरातून हा निर्णय झाला पाहिजे यासाठी प्रयत्न केला जावा, सचिवांची संख्या कमी असल्याने कोणत्याही संस्थेला पूर्ण वेळ देता येत नाही, अडचणी येतात त्यामुळे सचिवांची देखील नाहक धावपळ होते. आमदार भरणे व मी या बॅकेच्या संचालक मंडळात असल्याने शेतकऱ्यांना जेवढी मदत करता येईल तेवढी करतो, जिल्हा बॅंक गावात झाल्याने गावच्या विकासासाठी पोषक वातावरण राहिल, शेतकऱ्यांनी या बॅंकेतून शेती कर्ज व इतर सुविधा घ्यावा असेही आवाहन जगदाळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.बाळासाहेब लोखंड तर साहेबराव मोहिते यांनी आभार मानले.

  • शेतकऱ्यांना चांगल्या सेवा सुविधा दिल्याने राज्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा वेगळा दरारा व ठसा निर्माण झालेला आहे. जरी ही बॅंक राष्ट्रवादीच्या ताब्यात असली तरी देखील कधीच राजकीय रंग देण्यासाठी बॅंकेने शेतकऱ्यांची कोंडी केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात 281 शाखा सुरू आहेत. शिस्त व काटकसर व नियोजन याचा संगम साधून बॅंकेचे कामकाज सुरू आहे. रेडणी गावातील बॅंकेची शाखा ही काटी गावात ट्रान्सफर करण्याच्या हालचाली होत्या मात्र, काटी गावाला स्वतंत्र शाखा मिळाल्याने शेतकऱ्यांचे प्रश्‍न मार्गी लागणार आहेत.
    -दत्तात्रय भरणे, आमदार
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)