शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 20 कोटींचा प्राथमिक अहवाल

file photo

शेवगाव- तालुक्‍यातील बाधित कपाशी पिकाच्या मदतीसाठी 20 कोटी रुपये मदतीचा प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला आहे. यामध्ये 65 गावांचा समावेश आहे. उर्वरीत 38 गावांचे पंचनामे अपूर्ण आहेत.

तालुक्‍यात दरवर्षी 50 हजार हेक्‍टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्रात कपाशीचे पिक शेतकरी घेतात. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे या पिकाच्या नुकसानीचे दृष्टचक्र चालूच असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला कपाशीच्या लागवडीला वेग येतो. मात्र नंतरच्या काळात लहरी निसर्ग शेतक-यांच्या आशेवर पाणी फिरवतो. मागील वर्षी याच साडेसातीत शेतकरी अडकले. तरी सुध्दा शेतकऱ्यांपुढे पर्याय नसल्याने खरीपाच्या 34 व रब्बीच्या 79 अशा एकूण 113 गावात सुमारे 45 हजार हेक्‍टर क्षेत्रात कपाशी पिक घेतले गेले. पहिल्या वेचणीनंतर वातावरणात बदल होवून बोंडअळीच्या अक्रमणामुळे कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले.

-Ads-

शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करण्याची वेळ आली. या संदर्भात अधिक माहिती घेतली असता उर्वरित गावाचे पंचनामे चालू असल्याचे तहसीलदार दीपक पाटील यांनी सांगितले. पंचनामे करण्याच्या कामात कर्मचाऱ्यांच्या रिक्‍त जागेचा काही ठिकाणी अडथळा येत आहे.आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या शेतकऱ्यांना कपाशीची नुकसान भरपाई मिळावी, अशी राज्यभरातील शेतकऱ्यांनी मागणी केली. 33 टक्‍यांच्या पुढे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याचे आश्‍वासन राज्य सरकारने दिले. या पिकाचे पंचनामे सुरू झालेले असून अद्याप काही गावातील पंचनामे बाकी आहेत. येथील प्रशासनाने कपाशी बाधीत पिकाचा प्राथमिक नुकसानीचा अंदाज दिल्याची माहिती आहे. हे पंचनामे किती दिवस चालणार व मदत कधी मिळणार हे स्पष्ट नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)