शेतकऱ्यांच्या बरे वाईटास शासनच जबाबदार

रेडा- कोरड्या नीरा नदीच्या पात्रात गेल्या पाच दिवसांपसून शेतकऱ्यांचे उपोषण सुरू असून त्यांची प्रकृती खालावली आहे. रविवारी (दि. 25) तिघांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आज (सोमवारी) आणखी तिघांची प्रकृती खालावल्याने त्यांनाही रुग्णाल्यात भरती करण्यात आले असून आंदोलकांच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास यास सर्वस्वी सरकारच जबाबदार असेल अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलकांच्या घरच्यांनी व्यक्‍त केल्या.

पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी उपोषणकर्त्यांची आज (सोमवारी) भेट घेऊन त्यांच्या भावना समजून घेतल्या. तसेच आंदोलकर्त्यांसमोरच खासदार सुप्रिया सुळे यांना भ्रमध्वनीद्वारे संपर्क साधून आंदोलनाशी चर्चा घडवून आणली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरिराची काळजी घ्या, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व आमदार दत्तात्रय भरणे हे तोडगा काढण्यासाठी मंगळवारी (दि. 27) संबंधित विभागाच्या मंत्र्यांसमवेत बैठक करतील व निर्णय होईल अशा आशावाद त्यांनी संवादात नमूद केला.

दरम्यान, गेल्या पाच दिवसांपसून उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती अत्यंत खलावली असल्याने आज तिघांना इंदापूर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यामुळे पहिले तीन व आजचे तीन असे तब्बल सहा आंदोलक शेतकऱ्यांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये आज श्रीरंग यशंवत रासकर,वैभव अरूण जाधव,चंद्रकांत साहेबराव फडतरे यांना तर शनिवारी (दि. 24) रात्री अजिनाथ सुदाम कांबळे व शंकर शंभू होळ,किरण बोरा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या उपोषणाला अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष पवनराजे घोगरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह पाठिंबा पत्र देऊन पाठिंबा जाहिर केला

आंदोलकांचे मुले-मुली आंदोलनात

गेल्या पाच दिवसापासुन आमचे काका निरवांगी ठिकाणी उपोषणाला बसले आहेत, तरीही झोपलेल्या शासनास जाग येत नसून त्यांची नीरा नदीत पाणी सोडण्याची इच्छा नाही का? जर या आंदोलनादरम्यान कोणत्याही आंदोलकांचे बरे वाईट झाल्यास यास सर्वस्वी सरकार जबाबदार असेल, अशी संतप्त प्रतिक्रिया उपोषण करीत असलेले धनंजय रणवरे यांच्या मुली रिद्धी रणवरे व सिद्धी रणवरे, शिवांजली रणवरे यांनी व्यक्‍त केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)