शेतकऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी सेनेचा आंदोलनाचा इशारा

करहक, दि. 13 (वार्ताहर) – कुडाळ, ता. जावली येथील बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील शाखा प्रमुख मनोज लोखंडे व शिपाई गाढवे या दोघांनी संगनमत करून जावली तालुक्‍यातील सुमारे सात शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून 22 लाख रुपयाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी अजूनही बॅंक मॅनेजर मनोज लोखंडे याला अटक केली गेली नाही. येत्या 24 तासात फसव्या लोखंडेला अटक केली नाही तर शिवसेना शेकऱ्यांना घेऊन ठिया आंदोनल करेल, असा इशारा जावळी तालुका शिवसेना महिला संघटक जयश्री पवार यांनी दिला आहे.
जयश्री पवार म्हणाल्या, कुडाळमधील बॅंक ऑफ महाराष्ट्र ही राष्ट्रीय बॅंक आहे, अशा सरकारी बॅंकेमध्ये जर शेतकऱ्यांना फसवून मॅनेजर व एजंट वाटमारी करत असेल तर अशा व्यक्तीचा शिवसेना नक्की समाचार घेईल.
करंदी तर्फ कुडाळ, ता. जावली येथील नवनाथ तानाजी निकम व त्यांचे वडील तानाजी यशवंत निकम यांच्या नावावर बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेत पिक कर्ज काढून देतो असे सांगून, त्यांच्या जमिनीचे उतारे व इतर कागदपत्रे घेऊन बॅंकेचा शाखा प्रमुख मनोज लोखंडे बॅंकेतील शिपाई गाढवे यांनी संबंधित शेतकऱ्याच्या अज्ञानाचा व आपल्या अधिकाराचा गैरवापर करून, कर्ज प्रकरणावर सह्या घेऊन निकम पिता-पुत्राची सुमारे तीन लाख रुपये घेऊन या दोघांनीही फसवणूक केली आहे, असे अनेक शेतकरी जे आजही या भोंगळ कारभाराचे शिकार झाले आहेत. रोज एकएक प्रकरणे बाहेर पडू लागली आहेत. वास्तविक बॅंक ऑफ महाराष्ट्र ही खूप मोठी विश्‍वसनीय बॅंक आहे, मात्र बॅंकेचे वरिष्ठ अधिकारी मनोज लोखंडेला का पाठीशी घालत आहेत? याच्या पाठीमागच्या भानगडी उघड करणे गरजेचे आहे, बॅंकेच्या वरिष्ठांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे.
दरम्यान, निकम यांच्याप्रमाणेच शाखाप्रमुख मनोज लोखंडे व गाढवे यांनी शिवाजी वामन वेदपाठक (रा. करंदी), तानाजी महादेव निकम (रा. करंदी), प्रकाश लक्ष्मण गावडे (रा. आखेगणी), आनंद तुकाराम गंगावणे (रा. राणगेघर), जयश्री दत्तू पवार (रा. दरे बुद्रुक), या शेतकऱ्यांच्या नावावर आपल्या अधिकाराचा बेकायदेशीरपणे वापर करून त्याच्या किरकोळ जमिनीवर लाखो रूपायाचे कर्ज वाटले आहे. याप्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणीही शिवसेनेच्या नेत्या जयश्री पवार यांनी केली आहे

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)