शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे मनसेचं दुर्लक्ष – बाळा नांदगावकर

अहमदनगर –  शेतकरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नाकडे मनसेनं दुर्लक्ष केल्याची कबुली मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. ते अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. मनसेचं शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे  दुर्लक्ष झालं ही गोष्ट खरी आहे. मात्र आता ही चूक सुधारून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मनसेनं पुढाकार घेतला असल्याचंही त्यांनी म्हंटल.

बाळा नांदगावकर हे नगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी आणि गेल्या दीड वर्षापासून बरखास्त झालेली मनसे कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी आले होते . त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ग्रामीण भागाकडे मनसेनं  दुर्लक्ष केल्याच कबुल केलं. तसेच मनसे आता आपली ही चूक सुधारत असल्याचंही त्यांनी म्हंटल आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)