शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा उभारण्यासाठी संघटीत व्हा – संतोष वाडेकर

संगमनेर – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक लढा उभारण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर यांनी मंगळवारी संगमनेर तालुक्यातील जांबुत येथे भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी केले. यावेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष असिफ शेख व राज्य प्रवक्ते अनिल देठे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी बोलताना वाडेकर म्हणाले की , शेतकऱ्यांच्या शेतमालाला जो पर्यंत उत्पादन खर्चावर आधारित हमिभाव मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे जिवन सुखी व समाधानी होणार नाही.  शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात संघटित होऊन भूमिपुत्र शेतकरी संघटनेत सामिल व्हावे.  शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर व्यापक  लढा उभारावा असे अवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना देठे पाटील यांनी संघटनेची आतापर्यंतची यशस्वी वाटचाल व संघटनेच्या ध्येय , धोरणे विषद करत सरकार जाणीवपूर्वक शेतकरी वर्गावर अन्याय करत असुन शेतकरी प्रश्नांचे फक्त राजकीय भांडवल करत असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.तसेच शेतकऱ्यांनी यापुढे वीज , पाणी व हमिभाव या प्रश्नांची कायमची सोडवणुक करण्यासाठी व्यवस्थेशी लोकशाही मार्गाने संघर्ष करण्याची गरज असल्याचे सुतोवाच यावेळी केले. या वेळी स्थानिक नागरिकांसह संघटनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी ही आपले  मनोगतं व्यक्त केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
5 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)