शेतकऱ्यांच्या डोळ्यात दुष्काळाचे नव्हे पोरीला सासरी पाठवल्याचे आश्रू असतील

सभापती प्रविण माने यांची माहिती; इंदापुरात सामुदायिक सोहळ्याचे आयोजन

कुरवली- जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळीस्थितीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच इंदापूर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर करण्यात आल्यानंतरही शासनाकडून अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. कर्जमाफीची रक्कम अद्यापही सरकारच्याच तिजोरीत अडकून पडली आहे. यामुळे शेतकरी पुरता नाडला गेला आहे. याच करणास्तव तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मुला-मुलींची लग्नंही पुढे ढकलली असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, याच करणातून यावर पर्याय म्हणून सामुदायिक सोहळा करण्याचे नियोजन केले आहे. निसर्गाने पाठ फिरवली असली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहू, शेतकऱ्यांच्या डोळ्यातून आता दुष्काळामुळे नाही तर पोरीला सासरी पाठवल्याचे आश्रू येतील, असे आश्‍वासन जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे सभापती प्रवीण माने यांनी दिले.
राज्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने चालू वर्षी हातीची पीके गेली आहेत. कर्जमाफीसाठी बॅंकांमध्ये खाती उघडली पण ती मोकळीच पडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांनी मुला-मुलींची लग्न पुढे ढकलली आहेत. तर काहींनी तडजोड करून विवाह सोहळ्यांच्या खर्चाचे ओझे डोक्‍यावर घेण्याची तयारी केली आहे. परंतु, याच सामाजिक जाणीवेतून इंदापुरातील सोनाई परिवार पुढे सरसावला असून दि. 3 मार्च 2019ला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन मोफत करण्यात आली आहे.
राज्याच्या दुष्काळी यादीत इंदापुरचा समावेश करण्यात आला असला तरी शेतकऱ्यांना मदत मात्र मिळालेली नाही. शेतातच काय परंतु, घरातही धान्य नसल्याने विकतचे आणून खाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरांनाही चारा नाही, ती विकताही येत नाहीत, अशा स्थिथीत घरात लग्न कार्य काढायचे म्हणजे डोक्‍यावर कर्जाचे ओझे आणखी वाढवणार. बाजारात शेतमालाला हमी भाव नसल्याने कर्ज तरी कोणत्या जोरावर फेडणार, अशा स्थितीमुळे शेतकरी पुरता मेटाकुटीस आला आहे, अशा स्थितीत केवळ आश्‍वासने देण्यापेक्षा शेतरक्‍यांकरिता सोनाई परिवार पुढे आला असून अध्यक्ष दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन (दि. 3 मार्च) करण्यात आले आहे. या विवाह सोहळ्यामध्ये वधू-वरांचा पोषाख, मणीमंगळसुत्र, जोडवी, धर्मानूसार धार्मिक विधी, सर्व वऱ्हाडी मंडळींकरिता सुग्रास भोजन आदी व्यवस्था मोफत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

  • आहेर नको…चाऱ्याची एक पेंडी आणा…
    सोनाई परिवारच्या माध्यातुन प्रत्येक वर्षी दुष्काळामध्ये शेतकऱ्यांना मदत केली जाते. 2014च्या दुष्काळामध्ये राज्य सरकारला सोनाई परिवाराने 21 लाख रुपयांची मदत केली होती. चालू वर्षी दुष्काळी स्थितीमध्ये पाणी व पैशाची बचत करण्याकरिता विवाह सोहळा अयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्याला येणाऱ्या नागरिकांनी पुष्पगुच्छ व आहेरा ऐवजी एक चाऱ्याची पेंढी आणावी, असे आवाहन सभापती प्रवीण माने यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)