शेतकऱ्यांच्या आत्महत्येस सरकार जबाबदार

विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचा आरोप

मंचर- केंद्र आणि राज्य सरकारचे शहरी भागाकडे लक्ष आहे. ग्रामीण भागाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने ग्रामीण बाजारपेठा ग्राहकांअभावी ओस पडल्या आहेत. पर्यायाने अनेक व्यवसाय बंद पडून मंदीचे सावट निर्माण झाले आहे. अक्षरशः शेती पिकांना बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढीस लागले आहे. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केला आहे.
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात वळसे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा होते. यावेळी पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, बाळासाहेब बाणखेले, सूर्यकांत धायबर, अरुणा थोरात, रमेश खिलारी, पांडुरंग पाटील, डॉ. ताराचंद कराळे, पंचायत समितीचे कैलास काळे, संतोष भोर, शिवाजी लोंढे, भगवान वाघ, सुषमा शिंदे, बाबासाहेब खालकर, उत्तमराव थोरात, बाळासाहेब घुले, शांताराम हिंगे, ज्ञानेश्‍वर गावडे, बाळासाहेब थोरात, महेश मोरे, बाळासाहेब रंगनाथ बाणखेले, बाबाजी गावडे, नवनाथ निघोट, मनोहर सोमवंशी, सोपानराव नवले यांच्यासह बाजार समितीचे संचालक, व्यापारी, आडतदार, मापाडी आणि शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देऊन पिकांचे उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे वळसे पाटील यांनी सांगितले. यावेळी शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली.
यावेळी प्रास्ताविक भाषणात बोलताना बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम म्हणाले की, तळेघर व चांडोली खुर्द येथे लवकरच उपबाजार आवाराची उभारणी करण्यात येणार आहे. संस्थेचे सन 2017-18 मध्ये उत्पन्न 3 कोटी 96 लाख 52 हजार 599 रुपये आहे.खर्च 1 कोटी 83 लाख 97 हजार 390 रुपये आहे. वाढावा कोटी 12 लाख 55 हजार 209 रुपये आहे. उत्पन्नामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत व आवकेच्या तुलनेत शेतमालाला सरासरी बाजारभाव जास्त मिळाल्यामुळे उत्पन्नामध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे. तसेच खर्चामध्येही काटकसर केली आहे. बाजारसमितीस जो वाढावा मिळत आहे.त्यामधुन बाजार आवारात विविध सेवा सुविधा उपलब्ध करुन दिलेल्या आहेत. संस्थेकडे स्वनिधी म्हणून 15 कोटी 38 लाख 52 हजार 298 रुपये इतक्‍या ठेवी आहेत. या निधीतुन मंचर बाजार आवारातील विकास कामे करण्यात येणार आहेत. तसेच भविष्यात चांडोली खुर्द येथे नवीन मार्केट उभारण्याचा मानस आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक दत्ता हगवणे यांनी केले तर उपसभापती संजय शेळके यांनी आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)