शेतकऱ्यांच्या आतम्हत्या रोखण्यासाठी दोन हजार महिलांचे महालक्ष्मीला साकडे

टाकवे बुद्रुक, (वार्ताहर) – नुकत्याच धुळे येथील धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात विष प्राशान केल्याने त्याचा मृत्य्‌ू झाला. या आशा प्रकारच्या आत्महत्या संपूर्ण महाराष्ट्रत थांबवाव्यात यासाठी मावळ तालुक्‍यातील सुमारे दोन हजार महिला कोल्हापूर येथील महालक्ष्मीला जावून साकडे घालणार आहेत.

कामशेत येथील युवा उद्योजक देविदास गायकवाड याच्या विशेष प्रयत्नातुन या सर्व महिला कोल्हापूराला साकडे घातले आहेत. देविदास गायकवाड यांचा अभिष्टनचितनाचा कार्यक्रम नायगाव येथील मंगल कार्यालयात मावळ तालुक्‍यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या वेळी महिलांनी महाराष्ट्रातील तरूण ज्येष्ठ महिलांना चांगली बुद्धी मिळो आत्महत्या करण्याचे वाईट विचार त्यांच्या मनामध्ये येऊन देऊ नको अशी प्रार्थना एकत्रित सर्व महिलांनी केली, तसेच या कार्यक्रमामध्ये मावळ तालुक्‍यासाठी देविदास गायकवाड यांच्याकडून एक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.

या वेळी सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, नगरसेवक गणेश खांडगे, कैलास गायकवाड, उद्योजक देविदास गायकवाड, आण्णा मंजुळे, सुनील गायखे, अमित ढोरे, समीर असवले, नवनाथ चोपडे, वैशव शिंदे, भावेश थोरात, गुलाब दळवी, मिथुन वाळुंजकर, नितीन गायकवाड, सुधीर गायकवाड, निलेश वावरे, दादा वावरे, सोमनाथ दाभाडे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन घोटकुले यांनी केले. महादेवमामा भोईर यांनी आभार मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)