शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पांतर्गत पाणीपुरवठ्याचे नियोजन- गिरीष महाजन

खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न

मुंबई: खरीप व रब्बी हंगाम 2018-19 साठी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन खडकवासला प्रकल्पांतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात येईल, असे जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

-Ads-

आज विधान भवनात खडकवासला प्रकल्प कालवे सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली. यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, कालवे सल्लागार समितीचे सदस्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यासाठी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी  पुणे जिल्ह्यातील हवेली, दौड,इंदापूर आणि बारामती या चार तालुक्यातील वापरण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात यावे असे  श्री. महाजन यांनी या  बैठकीत सांगितले.

या बैठकीत खडकवासला प्रकल्प सिंचन क्षेत्र, प्रकल्पीय पाणी नियोजन, सन2018-19 मधील खरीप हंगामातील सिंचनाचे नियोजन, खरीपासाठीच्या पाणी वापराचे ‍नियोजन / बिगर सिंचनासाठी झालेला पाणी वापर /अपेक्षित पाणीपुरवठा,पुणे महानगरपालिकेचा पाणी वापर, रब्बी हंगामासाठीचा पाणी वापर, सिंचन व्यवस्थापन कामकाजात येणाऱ्या अडचणी, निरा उजवा कालवा अंतर्गत होणाऱ्या पाणीपुरवठा   या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)