शेतकऱ्यांचे उपोषण कोरडेच

रेडा- नीरा नदीत अवघे एक टीएमसी पाणी सोडावे या मागणीसाठी निवरवांगी (ता. इंदापूर) येथे कोड्या नदीपात्रात शेतकऱ्यांचे गेल्या आठ दिवसांपासून बेमुदत उपोषणासह रास्तारोको, काळ्या गुढी उभारणी, मुंडणकरी आदी प्रकारेद्वारे शासनाचा निषेध नोंदविला. तरीही शासनाला पाझर फुटला नाही अन्‌ त्यांनी नीरा नदीत पाणी न सोडण्याचा निर्णय बुधवारी (दि. 28) जाहीर केला. या निर्णयाने शेतकरी संतप्त झाले व त्यांनी अधिकाऱ्यांना येथे न येण्याची तंबीच दिली, तर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला होता. मात्र, स्वतःचे अस्तित्व न हरण्याची भूमिका आंदोलकांनी घेतल्याने आज (गुरुवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास, उपोषण पाठींबाधारक शेतकऱ्यांच्या सहमत्या घेऊन उपोषणाची सांगता करण्यात आली.
इंदापूर तालुक्‍याचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी शासनाचा प्रतिनिधी या नात्याने उपोषणकर्त्यांची खालावलेली प्रकृतीही चिंताजनक आहे, स्वतःचे आयुष्य हरवून जाऊन न्याय मिळतो का त्यामुळे केलेले उपोषण देखील पुढील कालावधीतील अडचणीला एक ऊर्जा असेल, त्यामुळे नाउमेद न होता शासनाच्या आदेशाचा स्वीकार करीत उपोषण सोडावे, अशी विनंती त्यांनी आंदोलनकर्त्यांना केली. या आव्हानाला प्रतिसाद देत उपोषण सोडण्याचा निर्णय झाला व ज्यूस देऊन तहसीलदार श्रीकांत पाटील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते उपोषण सोडण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, निरवांगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, आरोग्य पर्यवेक्षक नागनाथ खाराडे, आरोग्य सेविका सुरेखा शहागडकर, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता लक्ष्मण सुद्रिक, विठ्ठल पवार, दत्तात्रय पोळ, डॉ. रमेश गायकवाड, धनंजय पाटील, पप्पू पाटील, रणजीत पाटील, वीरसिंह रणसिंग, अभिजीत पाटील, अनिल रणवरे यांच्यासह हजारो शेतकरी उपस्थित होते.
नीरा नदीला पाणी मिळण्यासाठी गेली आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचे कोरड्यापात्रात उपोषण सुरू होते उपोषण सुरू असल्याने शासनस्तरावरून मुक्‍या जनावरांचा व नागरिकांचा पिण्याच्या पाणीप्रश्‍न निकालात निघेल व नीरा नदीला पाणी सोडले जाईल, अशी आशा भाबडी आशा आंदोलनकर्त्यांना होती. पण या भाबड्या आशेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पाटबंधारे विभाग व सरकारने केले असल्याचे म्हणत शासनाचा तीव्र शब्दांत निषेध नोंदविला.

  • आता न्यायालयीन लढतीचा निर्धार
    आगामी भूमिका ठरवण्यासाठी हजारो शेतकरी आज (गुरुवारी) नदीपात्रात उपोषणस्थळी दाखल झाले. व मानवतेच्या दृष्टिकोनातून शासनाने विचार केला नाही म्हणून शेतकऱ्यांनी आपली भूमिका आक्रमक मांडून शासनाचा निषेध केला. न्यायालयीन प्रक्रिया लढण्याचा निर्धार करीत शेतकरी सल्लागार समितीतील सदस्य कालवा सल्लागार समितीला नेमावा अशी शेतकऱ्यांनी भावना व्यक्‍त केली.
  • 192 तास शासन आमचे रक्त प्यायले
    नीरा नदीकाठच्या जनावरांना,नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळावे एवढाच उद्देश घेऊन उपोषणास बसलो होतो; परंतु ज्या शासनाकडे आपण मायबाप म्हणून बघतो त्या सरकारला पाझर फुटला नाही व 192 तास उपोषणकर्त्यांचे रक्‍त त्यांनी प्यायले आहे, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी शासनावर केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
7 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)