शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी महाधनचा उपक्रम

पुणे, महाधन स्मार्टटेक या ब्रॅंड श्रेणीच्या अंतर्गत महाधनतर्फे 10:26:26: आणि 12:32:16 या खतांच्या नावीन्यपूर्ण श्रेणी सादर करण्यात आल्या आहेत. स्मार्टटेक हे एक क्रांतिकारी आणि अपारंपरिक खत असून त्यामुळे जमिनीला पोषण मिळते, पिकांची मुळे सक्षम होतात. या उच्च दर्जाच्या खतामध्ये स्मार्टटेक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक दाण्याला खास वेष्टन पुरविण्यात आले आहे. त्यामुळे महाधन स्मार्टटेकचा वापर केल्यास जमिनीची उत्पादकता वाढीस लागते आणि पिकातील पोषणमूल्ये सुधारतात.

खरीप मोसम आता वेगाने जवळ येत चालला असून आमचे नवे उत्पादन सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीशी निगडीत सर्व पोषण गरजाविषयक सहाय्य पुरवेल, असे पीक पोषण व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी सांगितले. स्मार्टकेम टेक्‍नोलॉजीज लिमिटेड (एसटीएल) या देशातील आघाडीच्या खते उत्पादक कंपनीतर्फे महाधन या ब्रॅंडअंतर्गत सादर करण्यात येणाऱ्या आपल्या नाविन्यपूर्ण आणि नव्या युगाच्या खत उत्पादनांच्या माध्यमातून बाजारपेठेत क्रांती घडवून आणली जात आहे. हा ब्रॅंड गुणवत्ता आणि विश्वास यांचा समानार्थी शब्द म्हणून ओळखला जातो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)