शेतकऱ्यांची संपूर्ण तूर खरेदी; ग्राहकांना संरक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न – देशमुख

मुंबई – शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहून ग्राहकांचे संरक्षण करण्याचे काम शासन करीत आहे. राज्य शासनाने २५ लाख क्विंटल तूर खरेदी केली आहे. विल्हेवाट लावण्यासंदर्भात तुरीची डाळ विकण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ग्राहकांनाही माफक दरात तूरडाळ देण्याचा शासनाने प्रयत्न केला असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

विरोधी पक्षाच्या अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना विधानसभेत  देशमुख बोलत होते.देशमुख म्हणाले, तुरीचे गाळप करून डाळीत रूपांतर करून ते विकण्यासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. दोन हजार टन रोज तुरीचे गाळप व्हावे अशी अट निविदेत होती. या अटींचे पालन होत नसल्याने फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या.

तूर आणि डाळीचे गाळप करताना गैरप्रकार झाला नसून शासन कुणालाही पाठिशी घालत नाही. ६९ टक्केवारी दराने निविदा काढण्यात आली होती. मार्केटींग फेडरेशनमध्ये पारदर्शक कारभार झाला आहे. शेतकऱ्याने उत्पादन केलेली तूर पूर्णपणे खरेदी करण्याचा हेतू साध्य करण्यात आला आहे. ग्राहकांनाही माफक दरात तूरडाळ मिळावी यासाठी ५५ रूपये किलो दराने तूरडाळ देण्यात आली आहे, असेही देशमुख म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)