शेतकऱ्यांची फसणवणूक रोखण्यासाठी शिरूरला दक्षता पथक स्थापन

शिक्रापूर – सध्या शेतकऱ्यांचा पेरणी हंगाम सुरु झाला असून या हंगामातील खते आणि बी-बियाणे खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुक्‍याच्या वतीने दक्षता पथकाची स्थापना केली आहे, अशी माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शिरूर तालुकाध्यक्ष सुनील हिंगे यांनी दिली आहे.
शिरूर तालुक्‍यात स्थापन करण्यात आलेल्या या दक्षता पथकामार्फत शिरूर तालुक्‍यातील खते, बी-बियाणे वितरकांच्या दुकानांची पाहणी करण्यात येणार आहे. यात वितरकांनी परवाने दर्शनी ठिकाणी लावले आहेत का?, परवानाधारक दुकानात आहेत का?, खते आणि बियाणांचा साठा फलक लिहिला आहे का?, ग्राहकांना दिलेल्या मालाच्या रकमेची पावती दिली जाते का? याची पाहणी करण्यात येणार आहे. तसेच साठेबाजी होत असल्यास कृषी विभागाला अहवाल पाठविण्यात येणार आहे. या दक्षता पथकाचे अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे शिरूर तालुकाध्यक्ष सुनील हिंगे हे असून संघटक दिलीप हिंगे, पंडित मासळकर, राहुल दिघे, अशोक दरेकर, सतीश थिटे, संपत फराटे, संतोष शेलार, सुनील कदम, लहू कामठे यांसह आदी कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर शेतकरी आणि ग्राहकांनी खते आणि बी-बियाणे अधिकृत दुकानदारांकडून खरेदी करावीत. बियाणे कोणत्या हंगामासाठी पेरणी करायचे आहे? हे नमूद कारावे. बियाणे खरेदीची पावती घेऊन ती जपून ठेवावी. पावतीवर बॅच नंबर, लॉट नंबर, कोणता हंगाम याची पावतीवर नोंद करून घ्यावी. तसेच पेरणीनंतर थोडे बी शिल्लक ठेवावे. बियाणांची पिशवी खालील बाजूने फोडावी. तसेच पावती, रिकामी पिशवी आणि त्यामध्ये थोडे बियाणे जपून ठेवावे, असे आवाहन देखील अध्यक्ष सुनील हिंगे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)