शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात

मुंबई : शेतकऱ्यांची पहिली औद्योगिक वसाहत जालन्यात परतूर तालुक्यातील आष्टी या गावात होत असून या माध्यमातून शेतकरी उद्योजक होण्याचा मार्ग ना केवळ प्रशस्‍त होईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास देखील मदत होणार असल्याने या संदर्भातील प्रस्ताव लवकरात लवकर मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, अशा सूचना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या.काल अर्थमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रुर्बन व मानव विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी पिकवलेल्या उत्पादनांवर त्याच शेतकऱ्यांच्या औद्योगिक वसाहतीमधील विविध कारखान्यांमधून किंवा उद्योगांच्या माध्यमातून प्रकिया केल्या जाणार असून, त्याचे मूल्यवर्धन केले जाईल, यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, रोजगार संधीची निर्मिती होणार असून, शेतकऱ्यांना उद्योजक बनवण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल म्हणून या  औद्योगिक  वसाहतीकडे पाहण्यात येत आहे. तसेच यामधून शेतीला जोडधंद्याची साथ मिळून  त्याचा शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या फायदा होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)