शेतकऱ्यांची तोंडी आश्‍वासनावर बोळवण

निमसाखर- कळंब ते सराटी पर्यंतचे नीरा नदीवरील कोरडेठाक पडलेले बंधारे पाटबंधारे खात्याने तातडीने भरावेत या मागणीसाठी 25 गावांतील नागरिकांनी निरवांगी (ता. इंदापूर) येथे सुमारे दिडतास रास्तारोको केला. यावेळी अंदोलनकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे पाटबंधारे खात्याकडून तोंडी आश्‍वासन दिले आहे. तर गुरुवार (दि. 22) पर्यंत नदीमध्ये पाणी न आल्यास नदीच्या कोरड्या पात्रात उपोषणावर आंदोलनकर्ते ठाम आहेत.
इंदापूर तालुक्‍यात नीरा नदी कोरडी पडल्याने नदीकाठच्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना ही बंद पडल्या असून पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून नीरा नदीत पाणी सोडण्याची आग्रहाची मागणी त्यांनी केली आहे. यासाठी 600 ते 700 शेतकरी आज रस्त्यावर उतरले. त्यांनी आज बावडा-वालचंदनगर मार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन केले. इंदापूर तालुक्‍यामध्ये नीरा नदीवरील बंधाऱ्यामधील पाणी संपल्याने नीरा नदी कोरडी पडली आहे. नदीमध्ये पाणी डिसेंबर अखेरीलाच पाणी आटल्याने नदीकाठच्या गावांना पाणी टंचाईच्या झळा फेब्रुवारी महिन्यापासूनच सोसाव्या लागत आहेत. मार्च महिना सुरु झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याची टंचाई ही वाढली असल्याने आहे. त्यामुळे नदी काठची जवळपास हजारो एकरातील पिके धोक्‍यात आली आहेत. तर पाणी सोडण्याची मागणी करुन ही प्रशासन चालढकल करीत असल्याने शेतकरी संतप्त झाले असून ते आता रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनात नदी काठच्या कळंब, निमसाखर, निरवांगी, दगडवाडी, खोरोची, पिठेवाडी, चाकाटी, बोराटवाडी, सराटी, निरनिमगाव, भगतवाडी व माळशिरस तालुक्‍यातील बांगर्डे, पळसमंडळ, उंबरे, कदमवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी उडी घेतली असून जर दोन दिवसांत पाणी सोडले नाही तर या गावातील शेतकरी आणखी संतप्त होणाची चिन्हे असल्याने नीरा नदीचे पाणी पेटल्याशिवाय राहणार नाही. यावेळी ऍड. कृष्णाजी यादव, दशरथ पोळ, अभिजीत रणवरे, दत्तात्रय पोळ, अजिनाथ कांबळे, हर्षल रणवरे, सुभाष जाधव, सोपानराव पवार, विलास वाघमोडे, शिवाजी पोळ, बापू रोकडे यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी अनेक राजकीय पुढारी, शेतकरी आंदोलक कार्यकर्त्यांबरोबरच महिलांचीही उपस्थिती मोठी होती.

  • लेखी आश्‍वासनाच द्या…
    आंदोलकर्त्यांकडून निमगांवचे पाटबंधारे खात्याचे अधिकारी लक्ष्मण सुदरीक हे निवेदन घेण्यासाठी उपस्थित होते. यावेळी निवेदन देत असताना अंदोलन कार्यकर्ते आक्रमक झाले होते.तर पाटबंधरे विभागाने लेखी आश्‍वासन द्यावे या भूमिकेवर शेतकरी ठाम होते मात्र, पुण्याचे कार्यकारी अभियंता प्रवीण कोल्हे यांच्याशी मोबाईलवरुन साधलेला संपर्क स्पिकरवर घेण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी योग्य तो पाठपुरावा करण्याचे किमान तोंडी आश्‍वासन दिल्यानंतर रास्तारोको अंदोलन थांबवण्यात आले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)