शेतकऱ्यांची कर्जमाफी शक्ती मिलची जागा विकून – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर – राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी आता सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकणार असल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी बोलताना सरकारकडून ही जागा विकण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत कोल्हापुरात बोलताना राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.

कोल्हापुरात एका कार्यक्रमावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. कर्जमाफीचा निधी उभारण्यासाठी मुंबईतील शक्ती मिलच्या जागेची विक्री केली जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकार लवकरच शक्ती मिलची मालमत्ता ताब्यात घेणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काही वर्षांपूर्वीच शक्ती मिल परिसरात एका महिला पत्रकारावर बलात्कार झाला होता. या प्रकरणानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून ही मिल अधिक चर्चेत आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)