शेतकरी, आदिवासींचा उलगुलान मोर्चा “आझाद’ मैदानात दाखल

मुंबई – दुष्काळ निवारण आणि आदिवासींच्या प्रश्‍नांसाठी आज शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. त्यामुळे ऐन हिवाळी अधिवेशनात सरकारला पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. लोकसंघर्षच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, सुभाष वारे, ज्येष्ठ न्यायधीश बी. जी. कोळसे पाटील करत आहेत.

-Ads-

राज्यभरातील सुमारे १८ जिल्ह्य़ांमधील १२ हजारांहून अधिक आदिवासी-शेतकरी या मोर्चासाठी मुंबईत आले आहेत. जोपर्यत मागण्या मान्य होत नाही. तोपर्यंत आझाद मैदानावर ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे लोकसंघर्ष समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या शिष्टमंडळाला चर्चेचे निमंत्रण दिले आहे. यानुसार लोकसंघर्ष मोर्चाचं शिष्टमंडळ आज दुपारी १:३० वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. तत्पूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी रात्री आंदोलकांची भेट घेतली. याप्रकरणी आज तोडगा निघेल, असा विश्वास व्यक्त केला.

‘या’ आहेत शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या 

– दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याची शेतकऱ्यांची मागणी

– दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये दारिद्र्य रेषेखालील किंवा त्यावरील असा भेदभाव न करता सरसकट सर्वांना दोन रुपये किलोने धान्य द्या

– आपत्ती निवारण कायद्याप्रमाणे जिरायत जमिनीला हेक्‍टरी पन्नास हजार व बागायत जमिनीला हेक्टरी एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात या

– दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना व स्वाभिमान सबलीकरण योजनांतर्गत महाराष्ट्रात येत्या काळात मागास प्रवर्गातील व्यक्ती, तसेच आदिवासींना किती जमीन मिळणार आहे याचा आराखडा सादर करा

– स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची तातडीनं अंमलबजावणी करण्याची शेतकऱ्यांची मागणी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)