शेतकऱ्यांचा आज देशव्यापी संप…

शिरूर- राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकता यांचा शुक्रवार (दि.1 जून) पासून देशव्यापी संप आहे, अशी माहिती किसान क्रांती मोर्चाचे राज्यसमन्वयक नितीन थोरात यांनी दिली. शेतकरी संपाबाबत शिरुर येथील बाजार समितीच्या सभागृहात याबाबत नुकतीच सभा पार पडली. या सभेला महाराष्ट्र समन्वय समितीचे श्रीकांत तराळ, शंकर दरेकर यांसह राहुल शिंदे, बी.आर.माशेरे, कैलास पवार, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, वैभव माशेरे, विजय भाईरकर, सुधीर पवार, पोपट घुले, विजय साळवे, जितेंद्र थोरात, बाबूराव कुरंदळे, डॉ.मुसळे यांसह तालुक्‍यातून शेतकरी उपस्थित होते.

याविषयी अधिक माहिती देताना थोरात यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, अल्पभूधारक शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी, शेतकऱ्यांना पेन्शन,शेती पंपासाठी मोफत वीज, बैलगाडी शर्यतीसाठी कायदेशीर मान्यता, दुधाला किमान 50 रुपये लिटर भाव, शेतमाल प्रक्रिया उद्योगामध्ये इथेनॉलसाठी प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांचा संप होत आहे. या संपात शिरुर तालुक्‍यातून प्रत्येक गावातून शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती थोरात यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)