शेतकऱ्यांचा अपमान देश सहन करणार नाही : राहुल गांधी 

नवी दिल्ली: आधी नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा पैसा सूटबूटवाल्या मित्रांच्या खिशात घातला. आता तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता. शेतकऱ्यांचा हा अपमान देश सहन करणार नाही, असा हल्लाबोल करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

छत्तीसगडमधील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैशावरुन कॉंग्रेसला चिमटा काढला होता. काही लोक गादीखाली पैशे ठेवून झोपायचे, कोणी घरातील भांड्यात पैसे ठेवायचे, कोणी गोणीत तर कोणी गहूखाली पैसे लपवून ठेवायचे, असे त्यांनी म्हटले होते. नोटाबंदीचे समर्थन करताना त्यांनी हे विधान केले होते. त्यावर राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान करु नये. शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता, असे सांगून मोदी त्यांचा अपमान करत आहे.

-Ads-

याबाबत त्यांनी एक व्हिडिओ क्‍लिप शेअर करत नीरव मोदी, मेहुल चोक्‍सी यांचा दाखला देत मोदींवर निशाणा साधला. तुम्ही कधी विजय मल्ल्या, मेहुल चोक्‍सी, नीरव मोदी यांना गहूचे पिक घेताना पाहिले आहे का?, तुम्ही आधी नोटाबंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांचा पैसा सूटबूटवाल्या मित्रांच्या खिशात टाकला. आता तुम्ही सांगताय की शेतकऱ्यांकडे काळा पैसा होता. शेतकऱ्यांचा हा अपमान देश सहन करणार नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

नरेंद्र मोदी येतात आणि 15 लाखाचे आश्वासन देतात. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देतील. पण आपल्या भाषणात साडे चार वर्षात किती रोजगार दिला याबाबत एकही चकार शब्द बोलणार नाहीत. मोदींनी उद्योजकांचे कर्ज माफ केले. पण शेतकऱ्यांने ते कर्जमाफी देत नाही’, असा टोलाही लगाविला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)